वऱ्हाडाचा ट्रक नाल्यात कोसळला, 25 ठार

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 मार्च 2018

भावनगर (गुजराथ) - भावनगर-राजकोट महामार्गावर रंडोला गावाजवळ मंगळवारी सकाळी ट्रक नाल्यामध्ये उलटल्याने 25 जणांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, लग्नाचं वऱ्हाड घेऊन निघालेल्या या ट्रकमध्ये 60 जणांचा समावेश होता. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, बचाव कार्य सुरु झाले आहे. 

उमरालाजवळ ट्रक आला असता, समोरून येणाऱ्या कारला वाचवण्याच्या नादात ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक पुलावरून नाल्यात कोसळला. अपघातात 25 वऱ्हाडी ठार झाले आहेत. तर 35 जण जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु झाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

Web Title: marathi news gujarat truck accident umrala bhavnagai