सरन्यायाधीश दिपक मिश्रांविरोधात महाभियोगसाठी विरोधी पक्ष एकत्र येतील!

marathi news Impeachment Motion Against Cji Dipak Misra
marathi news Impeachment Motion Against Cji Dipak Misra

नवी दिल्ली - सरन्यायाधीश दिपक मिश्रा यांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विरोधी पक्ष प्रयत्न करणार आहेत. मात्र सर्व विरोधी पक्ष याकरीता एकत्र येतील का? प्रश्न उपस्थित होत आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचूरी यांनी इतर पक्षांशी याबाबत बोलणे सुरु असल्याचे सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती जे. चेलामेश्वर, रंजन गोगोई, एम. बी. लोकूर आणि कुरिअन जोसेफ यांनी काही दिवसांपूर्वी एकत्रितपणे पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी जाहीरपणे सरन्यायाधीश दिपक मिश्रा यांच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त करीत त्यांचा मनमानी कारभार असतो, असा आरोप केला होता. या परिषदेने देशातील न्यायव्यवस्थेच्या स्थितीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता. सरन्यायाधीश मिश्रा यांनी या चार न्यायाधीशांची भेट घेऊन तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला होता. 

इतर विरोधी पक्ष सरन्यायाधीशांविरोधात महाभियोग लागू करावा यासाठी पाठींबा देतील असेच चित्र सध्यातरी दिसत आहे. 'सरन्यायाधीशांविरोधात अधिवेशनात महाभियोग ठराव मांडता येईल का, हे निश्चित करण्यासाठी विरोधी पक्षांशी संपर्क साधणार आहे' अशी माहिती देत सीताराम येचूरी म्हणाले, 'न्यायपालिकेचे स्वातंत्र्य अबाधित राहणे गरजेचे आहे. आता या प्रकरणात संसदच तोडगा काढू शकेन. यासाठी महाभियोगाचाच पर्याय समोर आहे.' राज्यसभेत विरोधकांकडे बहुमत आहे. त्यामुळे तिथेच महाभियोगाचा प्रस्ताव सर्वप्रथम मांडला जाईल, असे समजते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com