भारत बांगलादेश दरम्यान नव्या रेल्वेला हिरवा झेंडा

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

दोन्ही देशांतील जास्तीत जास्त नागरिकांना एकमेकांच्या संपर्कात राहण्याकरिता प्रोत्साहन दिले पाहिजे.
- नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : भारतातील कोलकत्यापासून बांगलादेशातील खुलना यादरम्यान नवीन रेल्वे सेवा सुरू करण्याच्या निर्णयाला हिरवा झेंडा दाखविण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या परराष्ट्रमंत्री शेख हसीना यांच्यात गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्स झाली. या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये हा निर्णय घेण्यात आला. 

दोन शेजारी राष्ट्रांच्या संबंधांच्या आड आंतरराष्ट्रीय शिष्टाचाराची औपचारिकता (प्रोटोकॉल) येता कामा नये असे मत व्यक्त करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी बोलताना म्हणाले, "दोन्ही देशांतील जास्तीत जास्त नागरिकांना एकमेकांच्या संपर्कात राहण्याकरिता प्रोत्साहन दिले पाहिजे."

"आज आमादेर मैत्री बंधन अरो शुभोड होलो" असे बंगाली भाषेत म्हणत पंतप्रधान मोदी यांनी बैठकीच्या सुरवातीला "आज आपल्यातील मित्रत्वाचे संबंध अधिक दृढ झाले" असे मत व्यक्त केले. "या नव्या रेल्वे सेवेमुळे कोलकाता ते ढाका संपर्क आज शक्य झाला आहे. यामुळे लोकांना विनातक्रार आणि सोयीस्कर प्रवास करता येईल. हे बांगलादेश आणि भारत यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधाचे फलित आहे," असेही मोदी म्हणाले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Web Title: marathi news india bangladesh train service gets green signal