'फ्लेक्‍सी फेअर'च्या जागी रेल्वे 'डायनॅमिक' आणणार

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 3 फेब्रुवारी 2018

नवी दिल्ली : प्रवाशांचे खिसे कापणाऱ्या 'फ्लेक्‍सी फेअर' या योजनेचा रेल्वे मंत्रालयाने फेरविचार केला असून, लवकरच एक नवी योजना आणली जाईल, असे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी आज राज्यसभेत सांगितले. मात्र गेल्या चार वर्षांत रेल्वेने तिकीटदर वाढविले नाहीत, या त्यांच्या दाव्यावर सर्वपक्षीय सदस्यांनी आश्‍चर्य व्यक्त केले. कारण गेल्या चार वर्षांत या ना त्या मार्गाने किमान तीन वेळा रेल्वेची तिकीट वाढ झाली असल्याची वस्तुस्थिती आहे. 'फ्लेक्‍सी'मुळे तिकीट दरवाढ विमानापेक्षा जास्त झाल्याचे भाजपचेच रामविलास नेताम यांनी सभागृहाला सांगितले. 

गोयल यांनी सांगितले, की 'फ्लेक्‍सी फेअर' प्रणालीऐवजी 'डायनॅमिक तिकीट दरप्रणाली' आणण्याचा रेल्वेचा विचार असून, ही योजना अंमलबाजवणीच्या टप्प्यात आहे. ('सकाळ'ने याआधीच हे वृत्त दिले होते) 'फ्लेक्‍सी' प्रणालीमुळे शताब्दी, राजधानी आणि दुरान्तो गाड्यांची प्रवासी संख्या घटली असून, रेल्वेच्या उत्पन्नातही घट झाल्याचे अहवाल रेल्वेला याआधीच मिळाले आहेत. गोयल म्हणाले, की 'डायनॅमिक' दरप्रणाली लागू करण्याबाबत मंत्रालयाला विस्तृत अहवाल मिळाला आहे. त्याच्याआधारे विविध हंगामांत तिकीट दर घटविणे वा वाढविणे याबाबत व्यावहारिक योजना तयार केली जात आहे. मागणी व उपलब्धता यांची यात सांगड घातली जाईल. 

सिग्नलव्यवस्था बदलणार 
देशातील जुनीपुराणी सिग्नलव्यवस्था आमूलाग्र बदलण्याचाही निर्धार गोयल यांनी बोलून दाखविला. ते म्हणाले, की रेल्वे तोट्यात चालली आहे, हे म्हणणे पूर्ण सत्य नाही. गाड्यांना विलंब होण्याचे प्रमुख कारण 100 वर्षे जुनी सिग्नलिंगव्यवस्था अजूनही चालू असणे हे आहे. ही नवी सिग्नलिंग प्रणाली लागू झाल्यावर गाड्यांचा वेग व रेल्वेची क्षमता दुपटीने वाढेल, असेही ते म्हणाले.

Web Title: marathi news Indian Railway Flexy Fare Piyush Goyal