'गर्लफ्रेंडला धोका देणं हा गुन्हा नाही' - नवी दिल्ली हायकोर्ट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

नवी दिल्ली हायकोर्टाने एक अनोखा फैसला सुनवलाय. हा फैसला आहे आहे एका प्रियकर आणि प्रेयासिसंबंधी. हा फैसला ऐकाल तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. गेल्या काही काळात लग्नाचं आमिष दाखवून प्रेयसीला धोका देण्याचं प्रमाण वाढलंय. शरीरसंबंध ठेवल्यानंतरही प्रेमात धोका देणं ही कितीही वाईट बाब वाटत असली तरीही हा गुन्हा ठरू शकणार नाही असा निर्णय नवी दिल्ली हायकोर्टाने दिलाय.

नवी दिल्ली हायकोर्टात एकावर प्रियकरावर बलात्काराचा आरोप करून संबंधित केस करण्यात आलेली. यात सेशन्स कोर्टाने दिलेला निर्णय कायम ठेवत या व्यक्तीची निर्दोष मुक्तता केली आहे. सध्याच्या जगात 'नाही चा अर्थ 'नाही'च्या पुढे जाऊन 'हो चा अर्थ हो'इथपर्यंत पोहोचला आहे, हे आपण स्वीकारलं पाहिजे असं कोर्टाने म्हटलंय.

Image By https://inspiringtips.com/

विवाहाचं आमिष दाखवून आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप या तरुणावर होता. मात्र दोन्ही न्यायालयांनी या केसमध्ये या तरुणाची निर्दोष मुक्तता केलीये. एकमेकांच्या संमतीने शरीर संबंध ठेवल्यास तो गुन्हा ठरू शकत नाही असं मत कोर्टाने नोंदवलं. सेशन्स कोर्टाने दिलेल्या निकालात कोणतीही त्रुटी नव्हती अशी प्रतिक्रिया नवी दिल्ली हायकोर्टाने दिली.     

पहिल्यांदा बलात्काराचा आरोप केल्यानंतर तीन महिन्यांनी ही महिला त्याच व्यक्तीसोबत आपल्या मर्जीने हॉटेलमध्ये जाताना दिसली. सदर महिला शरीरसंबंधांसाठी आपली सहमती ही स्वेच्छेने नव्हे तर तर विवाहाचे अमिष दाखवून मिळवण्यात आल्याचे सांगत होती. मात्र तिने हे सर्व सिद्ध करण्यासाठी वैद्यकीय तपासणीसही नकार दिला. त्यामुळे तिला विवाहाचं अमिष दाखवण्यात आल्याच्या तिच्या दाव्यातही फारसं तथ्य नसल्याचे समोर आले आहे.  

WebTitle : marathi news infidelity against girlfriend can not be be crime new delhi court

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news infidelity against girlfriend can not be be crime new delhi court