अखेर पाकने हाफिज सईदला केले दहशतवादी घोषित

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

अमेरिकेच्या दबावापुढे पाकिस्तान अखेर झुकले असून, पाकिस्तानकडून हाफिज सईदला दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आले आहे. आज (मंगळवार) पाकिस्तानचे राष्ट्रपती ममनून हुसैन यांनी 'अँटी टेरेरिझम अॅक्ट' (दहशतवादविरोधी कायदा) संदर्भातील अध्यादेशावर स्वाक्षरी केली. 

नवी दिल्ली : जगातील सर्वात शक्तिशाली देश अशी ओळख असलेल्या अमेरिकेच्या दबावापुढे पाकिस्तान अखेर झुकले असून, पाकिस्तानकडून हाफिज सईदला दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आले आहे. आज (मंगळवार) पाकिस्तानचे राष्ट्रपती ममनून हुसैन यांनी 'अँटी टेरेरिझम अॅक्ट' (दहशतवादविरोधी कायदा) संदर्भातील अध्यादेशावर स्वाक्षरी केली. 

Hafiz saeed

या अध्यादेशांतर्गत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने बंदी घातलेली दहशतवादी संघटना आणि त्यासंबंधित कार्यालये, खाती पाकिस्तान सरकारला बंद करावी लागणार आहेत. या अध्यादेशानुसार लष्करे तोयबा, जमात-उद-दवा आणि हरकत-उल-मुजाहिद्दीनही यामध्ये सामील आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने जारी केलेल्या या यादीमध्ये 27 संघटनांची नावे आहेत. दरम्यान, प्रत्येक पाकिस्तानी नागरिकाप्रमाणे काश्‍मीरचा मुद्दा उपस्थित करण्याचा सईदला हक्क आहे. काश्‍मीर प्रश्न सोडविण्यासाठी तो महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतो, असे पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमार जावेद बाज्वा म्हणाले होते.

त्यावेळी बाज्वा यांनी सईदची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आता हाफिज सईदला पाकिस्तानकडून दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आले आहे.
 

Web Title: Marathi News International News Hafiz Saeed declares as Terrorist by Pakistan Pressure USA