अब्जाधीशांच्या यादीत भारत तिसऱ्या क्रमांकावर !

वृत्तसंस्था
बुधवार, 7 मार्च 2018

'फोर्ब्स'ने जारी केलेल्या यादीनुसार भारतात एकूण 19 नवे अब्जाधीश आहेत. मागील वर्षी भारतातील अब्जाधीशांचा आकडा 102 वर गेला होता. यामध्ये आता वाढ होऊन हा आकडा 121 वर गेला आहे. अमेरिकेत सर्वाधिक ५८५ आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या चीनमध्ये ३७३ अब्जाधीश आहेत.

न्यूयॉर्क : भारताच्या श्रीमंतीत आता वाढ झाली आहे. कारण अब्जाधीशांच्या यादीत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर गेला आहे. 'फोर्ब्स'च्या अब्जाधीशांच्या यादीत जर्मनीला मागे टाकत भारत तिसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. अब्जाधीशांची संख्या अमेरिकेत सर्वाधिक असून, त्यानंतर चीनचा क्रमांक येतो आणि चीननंतर भारताचा क्रमांक येतो.

india wealth

'फोर्ब्स'ने जारी केलेल्या यादीनुसार भारतात एकूण 19 नवे अब्जाधीश आहेत. मागील वर्षी भारतातील अब्जाधीशांचा आकडा 102 वर गेला होता. यामध्ये आता वाढ होऊन हा आकडा 121 वर गेला आहे. अमेरिकेत सर्वाधिक ५८५ आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या चीनमध्ये ३७३ अब्जाधीश आहेत. 'फोर्ब्स'ने जारी केलेल्या अब्जाधीशांच्या या यादीत अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेझोज 112 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह प्रथम क्रमांकावर आहेत. तसेच प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांची संपत्ती मागील वर्षीच्या तुलनेत 1.09 लाख करोड रूपये (16.9 अब्ज डॉलर) वाढली आहे. सध्या त्यांची संपत्ती 2.60 लाख करोड रूपये (40.1 अब्ज डॉलर) इतकी आहे.  

त्यामुळे जागतिक पातळीवर श्रीमंतीत मुकेश अंबानी ३३ व्या क्रमांकावरून १९ व्या क्रमांकावर पोहचले आहेत. २०१७ मध्ये २३.२ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह ते ३३ व्या स्थानावर होते. लक्ष्मी मित्तल हे यापूर्वी भारतातील श्रीमंतीत दुसऱ्या क्रमांकावर होते. मात्र, आता अझीम प्रेमजी यांनी त्यांना मागे टाकत भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती म्हणून दुसरा क्रमांक मिळवला आहे. 
 

Web Title: Marathi News International News India is third Richest country in the world