कुलभूषण जाधव यांच्यावर पुन्हा चालवला जाणार खटला 

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

जाधव यांच्याविरोधात एकापेक्षा अधिक खटले दाखल झाले आहेत. जाधव यांच्याविरोधात दहशतवाद आणि घातपाताचा आरोप आहे. या आरोपांवरून त्यांच्याविरोधात नवा खटला चालवला जाणार आहे. 

नवी दिल्ली : हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानात शिक्षा भोगत असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. जाधव यांच्यावर आता दहशतवाद आणि घातपातच्या आरोपाखाली पुन्हा एकदा खटला चालवला जाणार आहे. याबाबतची माहिती पाकिस्तानचे वृत्तपत्र 'डॉन' या वृत्तपत्रात दिली आहे.  

pakistan defence court

गेल्या अनेक महिन्यांपासून जाधव हे पाकिस्तानात शिक्षा भोगत आहेत. यापूर्वी पाकिस्तानच्या सैन्य दलातील न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र, आता जाधव यांच्याविरोधात दहशतवाद आणि घातपातच्या आरोपाखाली खटला चालवला जाणार आहे. हा खटला नेमक्या कोणत्या न्यायालयात चालवला जाणार, याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.  

kulbhushan yadav

याबाबत पाकिस्तान सरकारने 'डॉन'ला सांगितले, की जाधव यांच्याविरोधात एकापेक्षा अधिक खटले दाखल झाले आहेत. जाधव यांच्याविरोधात दहशतवाद आणि घातपाताचा आरोप आहे. या आरोपांवरून त्यांच्याविरोधात नवा खटला चालवला जाणार आहे. 

दरम्यान, पाकिस्तानच्या या नव्या खटल्याच्या सुनावणीनंतर जाधव यांना कोणती शिक्षा सुनावली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Web Title: Marathi News International News Kulbhushan Jadhav Pakistan New Case