बेपत्ता झालेले मालवाहू जहाज सापडलेे ; 22 भारतीयांची सुखरूप सुटका

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

नवी दिल्ली : पश्‍चिम आफ्रिकेच्या बेनिन किनारपट्टीवरून बेपत्ता झालेले तेलवाहू जहाज सापडले असून, यातील 22 भारतीय नागरिकांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. 

sushma swaraj

नवी दिल्ली : पश्‍चिम आफ्रिकेच्या बेनिन किनारपट्टीवरून बेपत्ता झालेले तेलवाहू जहाज सापडले असून, यातील 22 भारतीय नागरिकांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. 

sushma swaraj

याबाबत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटवरून ही माहिती दिली. त्या म्हणाल्या, मला हे सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे, की मर्चंटशिप मरीन एक्स्प्रेस बोर्डचे जहाज सापडले असून, यातील 22 भारतीयांची सुटका करण्यात आली आहे. आम्ही नायजेरिया आणि बेनिन सरकार मदतीसाठी आभारी आहोत.

ship

दरम्यान, जहाजाचे समुद्री चाच्यांनी अपहरण केले असावे, अशी शक्‍यता वर्तविली जात होती मात्र, आता हे जहाज मिळाले आहे.  

Web Title: Marathi News International News Nigeria and Benin 22 rescused