राष्ट्रपती मुखर्जी उद्यापासून पश्‍चिम बंगाल दौऱ्यावर

वृत्तसंस्था
गुरुवार, 13 जुलै 2017

नवी दिल्ली - राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे शुक्रवारपासून दोन दिवसांच्या पश्‍चिम बंगालच्या दौऱ्यावर जात असून, राष्ट्रपती म्हणून हा त्यांचा शेवटचा दौरा असल्याची माहिती आज राष्ट्रपती भवनाच्या सूत्रांनी दिली. मुखर्जी येत्या 25 जुलैला राष्ट्रपतिपदावरून कार्यमुक्त होत आहेत. आपल्या दौऱ्यात ते जांगीपूर येथे राहणार आहेत.

2004 मध्ये येथूनच त्यांनी लोकसभेची निवडणूक लढविली होती. ग्रामीण फुटबॉल स्पर्धेचे त्यांच्या हस्ते उद्‌घाटन होणार आहे. त्याचप्रमाणे एलपीजी कनेक्‍शनचेही त्यांच्या हस्ते वितरण करण्यात येईल, असेही सूत्रांनी सांगितले. मुखर्जी 2012 मध्ये राष्ट्रपती झाल्यानंतर त्याचा मुलगा अभिजित हे जांगीपूर येथून दोनदा विजयी झाले आहेत. मुखर्जी यांनी 1969 मध्ये राज्यसभेचे सदस्य म्हणून आपल्या राजकीय कारर्किदीला सुरवात केली होती. त्यानंतर 2004 मध्ये त्यांनी जांगीपूर येथून लोकसभेची निवडणूक लढविली होती आणि विजय मिळविला होता. त्यानंतर 2009 मध्येही येथून ते विजयी झाले होते.

Web Title: marathi news international news pranav mukharjee