हाफिज सईदसह अन्य दहशतवाद्यांविरोधात आरोपपत्र दाखल

वृत्तसंस्था
गुरुवार, 18 जानेवारी 2018

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) गुरुवारी लष्करे तैयबाचा म्होरक्या हाफिज सईद आणि हिज्बुल मुजाहिद्दीनचा प्रमुख सईद सलाहुद्दीन या दहशतवाद्यांविरोधात रसद पुरवल्याच्या आरोपावरून आरोपपत्र दाखल करण्यात आले. 

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) गुरुवारी लष्करे तैयबाचा म्होरक्या हाफिज सईद आणि हिज्बुल मुजाहिद्दीनचा प्रमुख सईद सलाहुद्दीन या दहशतवाद्यांविरोधात रसद पुरवल्याच्या आरोपावरून आरोपपत्र दाखल करण्यात आले. 

हाफिज सईद, सईद सलाहुद्दीन या दहशतवाद्यांसह अन्य 10 दहशतवाद्यांविरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणेने 12,794 पानांचे आरोपपत्र दाखल केले असून, या सर्वांच्या चौकशीसाठी न्यायालयाकडे परवानगीही मागितली आहे. दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आले. एएनआयने 60 ठिकाणी छापेमारी करत 950 संशयास्पद कागदपत्रे जप्त केली आहेत. यात सुमारे 300 साक्षीदार तपासण्यात आले.

दरम्यान, एनआयएने अल्ताफ अहमद शाह ऊर्फ अल्ताफ फान्टोश, सय्यद अली शाह गिलानी यांचे जावई या दहशतवाद्यासह इतर दहशतवाद्यांना अटक केली. 

Web Title: Marathi news international Terror funding case NIA files chargesheet against LeT, Hizbul chiefs 10 others

टॅग्स