इस्रोने रचला नवा इतिहास; 100 व्या भारतीय उपग्रहाचे प्रक्षेपण

वृत्तसंस्था
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

आंध्रप्रदेश - येथील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्र येथून 100 व्या उपग्रहाने शुक्रवारी (आज) यशस्वी भरारी घेतली. PSLV-C40 द्वारे Cartosat-2 (कार्टोसॅट) हा हवामानाचा अभ्यास करणारा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला आहे. 

आंध्रप्रदेश - येथील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्र येथून 100 व्या उपग्रहाने शुक्रवारी (आज) यशस्वी भरारी घेतली. PSLV-C40 द्वारे Cartosat-2 (कार्टोसॅट) हा हवामानाचा अभ्यास करणारा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला आहे. 

2018 च्या सुरुवातीलाच भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) शुक्रवारी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून 100 व्या कक्षाचे यशस्वी प्रक्षेपण केले. चार महिन्यांपुर्वी  आयआरएनएसएस - 1 एच या उपग्रहाच्या स्पेस एजन्सीच्या अयशस्वी प्रक्षेपणानंतर कार्टोसॅट मिशनचे काम सुरु करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या या यशस्वी कामगिरीचे अभिनंदन केले आहे. याप्रसंगी ट्विट करत ते म्हणाले, या उपग्रहाच्या लाँचने भारताच्या अंतराळ कार्यक्रमाचे उज्ज्वल भविष्य दर्शविले आहे. तसेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील इस्रोला शुभेच्छा दिल्यात. ते म्हणाले, हा प्रत्येक भारतीयासाठी गर्वाचा क्षण आहे. ही कामगिरी भारतासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. 

PSLV-C40 हे भारताने विकसित केलेले उपग्रह प्रक्षेपणाचे तंत्रज्ञान आहे. ज्यातून हवामान निरीक्षणाचे कार्य करणारा कार्टोसॅट - 2 सहीत आणखी दोन उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले. तसेच या उपग्रहासोबतच आणखी 30 इतर देशांचे उपग्रहही प्रक्षेपित केले गेले. हे PSLV-C40 या तंत्रज्ञानाचे 42वे मिशन होते.  

Web Title: marathi news ISRO launched its 100th satellite called Cartosat-2