खोटं बोलल्याने वडिलाची मुलाला पट्ट्याने अमानुष मारहाण

वृत्तसंस्था
रविवार, 28 जानेवारी 2018

पीडित बालकाच्या आईचा मोबाईल खराब झाल्याने सर्व्हिस सेंटरमध्ये दुरुस्तीसाठी दिला होता. त्यादरम्यान मोबाईलमध्ये असलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून हा प्रकार समोर आला. जेव्हा ही घटना घडली तेव्हा त्या बालकाच्या आईने त्याला यापासून वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्या वडिलांनी मारहाण करणे थांबवले नाही. त्याला दोन-तीन वेळेस बेडवरून फेकत अमानुष मारहाण करण्यात आली.

नवी दिल्ली : जर एखाद्या मुलाने चूक केल्यास त्याला त्या चुकीमुळे अनेकदा संबंधित पालक समजावून सांगतात, ओरडून सांगतात वेळप्रसंगी मारतातही. मात्र, एका वडिलाने मुलगा खोटं बोलला म्हणून त्याला पट्ट्याने अमानुषपणे मारहाण केली. पीडित मुलगा हा दहा वर्षांचा असल्याची माहिती मिळत आहे. याबाबतचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियार व्हायरल होत आहे. 

कर्नाटकची राजधानी बंगळुरुमधील केंगेंरी परिसरात ही धक्कादायक घटना घडली. पीडित बालकाच्या आईचा मोबाईल खराब झाल्याने सर्व्हिस सेंटरमध्ये दुरुस्तीसाठी दिला होता. त्यादरम्यान मोबाईलमध्ये असलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून हा प्रकार समोर आला. जेव्हा ही घटना घडली तेव्हा त्या बालकाच्या आईने त्याला यापासून वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्या वडिलांनी मारहाण करणे थांबवले नाही. त्याला दोन-तीन वेळेस बेडवरून फेकत अमानुष मारहाण करण्यात आली. या गंभीर प्रकरणाचा व्हिडिओ त्या बालकाच्या आईने काढला आहे.

दरम्यान, संबंधित वडिलाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून, त्याला पोलिसांनी अटक केली आहे. 

Web Title: Marathi News Karnataka News Crime father assaulted his 10 year old son