कार्ती चिदंबरम यांना पाच दिवसांची कोठडी 

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 मार्च 2018

नवी दिल्ली : आयएनएक्‍स मीडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी कार्ती चिदंबरम यांना आज (गुरुवार) न्यायालयाने पाच दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली. यामुळे या गैरव्यवहाराची चौकशी करणाऱ्या सीबीआयला सहा मार्चपर्यंत कार्ती चिदंबरम यांचा ताबा मिळाला आहे. 

नवी दिल्ली : आयएनएक्‍स मीडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी कार्ती चिदंबरम यांना आज (गुरुवार) न्यायालयाने पाच दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली. यामुळे या गैरव्यवहाराची चौकशी करणाऱ्या सीबीआयला सहा मार्चपर्यंत कार्ती चिदंबरम यांचा ताबा मिळाला आहे. 

आयएनएक्‍स मीडियाचे प्रमुख पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जी यांच्या कबुलीजबाबाच्या आधारे सीबीआयने कार्ती यांना काल (बुधवार) अटक केली. कार्ती यांचे वडील पी. चिदंबरम केंद्र सरकारमध्ये अर्थमंत्री पदावर असताना 2007 मध्ये आयएनएक्‍स मीडियाला परकी निधी मंजूर करण्याप्रकरणी सीबीआयचा तपास सुरू आहे. या प्रकरणी कार्ती यांना तीन कोटींहून अधिक रुपयांची लाच दिल्याची माहिती इंद्राणी आणि पीटर यांनी दिली होती. या प्रकरणी कार्ती यांचे सनदी लेखापाल एस. भास्कररमण यांनाही अटक करण्यात आली होती. 

परदेशाहून परतलेल्या कार्ती यांना सीबीआयने विमानतळावरच अटक केली होती. अटक झाल्यानंतर दिल्लीतील न्यायालयाने कार्ती यांना एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती. सीबीआयने न्यायालयात 15 दिवसांची कोठडी मिळण्याची मागणी केली होती. याला कार्ती यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी विरोध केला.

'कार्ती यांची अटक वेगळ्याच हेतूने झाली आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये कार्ती यांना एकही समन्स बजाविण्यात आलेले नाही. याचाच अर्थ कुठल्याही तपास यंत्रणेकडे कार्ती यांच्यासाठी आणखी काही प्रश्‍न शिल्लक नाहीत', असा युक्तिवाद सिंघवी यांनी केला. सीबीआयने हा युक्तिवाद खोडून काढताना 'कार्ती तपासात सहकार्य करत नाहीत' असे न्यायालयासमोर सांगितले.

Web Title: marathi news Karti Chidambaram INX Media Scam