केरळात RSSच्या कार्यकर्त्याची हत्या; पुन्हा उफाळला राजकीय वाद

केरळात RSSच्या कार्यकर्त्याची हत्या; पुन्हा उफाळला राजकीय वाद

तिरूअनंतपुरम : एका खुनाच्या आरोपात जामिनावर बाहेर असलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता वदेक्केताला आनंदन याची आज (रविवार) भोसकून हत्या करण्यात आली. सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या (मार्क्सवादी) कार्यकर्त्यांनी ही हत्या राजकीय वादातून केल्याचा आरोप आरएसएस - भाजपकडून होत आहे. 

आनंदन याच्यावर सीपीआय कार्यकर्ता मोहम्मद कसिम यांच्या हत्येचा आरोप होता. दुपारी 1 वाजता आपल्या दुचाकीने येत असता त्यांच्यावर नेनमिनीजवळील गुरुवायुरच्या मंदिरात हल्ला करण्यात आला होता. त्यांची भोसकून हत्या करण्यात आली होती. या हल्लानंतर त्याला उपचारांसाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तेथेच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

याप्रकरणी आनंद याला अटक करण्यात आली होती. मात्र, तो सध्या जामिनावर सुटला होता. ही हत्या सूडातून करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. या घटनेमुळे राज्यात हिंसाचार माजला असून, सीपीआय (एम) आणि आरएसएस-भाजप या पक्षांमध्ये वाद चिघळला आहे. या घटनेचा विरोध करण्यासाठी आरएसएस-भाजपने गुरुवयूर मंदिर सोमवारी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय सतर्कता म्हणून वरिष्ठ पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले असून, ते परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

दरम्यान, केरळ प्रदेश भाजपचे अध्यक्ष कुम्मानम राजसेखरन यांनी काही दिवसांपूर्वी 'लाल आणि जिहादी दहशतवाद' राज्यव्यापी यात्रा काढली होती. या यात्रेमध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हेदेखील सहभागी झाले होते.

ई सकाळवरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com