महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना

वृत्तसंस्था
गुरुवार, 8 मार्च 2018

केरळ - देशभरात पुतळ्याची तोडफोड करण्याचे सत्र सुरुच आहे. आज(गुरुवार) केरळमध्ये अज्ञात व्यक्तींनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची तोडफोड केली असून, गांधींजीच्या पुतळ्यावरील चष्मा तोडला आहे. या घटनेवर नाराजी व्यक्त होत आहे.

त्रिपुरात अडीच दशकांची डाव्या पक्षांची सत्ता उलथल्यानंतर उन्मादाच्या भरात तोल सुटलेल्या संशयित भाजपा कार्यकर्त्यांनी सोमवारी लेनीन यांच्या पुतळ्याची तोडफोड केली. त्यानंतर मंगळवारी तामिळनाडूत द्रविड आंदोलनाचे जनक रामस्वामी पेरियार यांच्या पुतळ्याला लक्ष्य करण्यात केले गेले. बुधवारी कोलकत्यात जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुतळ्याची तोडफोड झाली. तर उत्तर प्रदेशमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. 

या पार्श्वभूमिवर, विविध विचारधारेच्या नेत्यांचे पुतळे सामाजिक क्षोभापासून वाचवण्याचे आदेश केंद्राने राज्यांना दिले असले तरी हे सत्र सुरुच आहे. 

Web Title: marathi news mahatma gandhi statue kerala