नितीशकुमार 'पलटूराम' आहेत : लालूप्रसाद यादव 

वृत्तसंस्था
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

नवी दिल्ली : 'बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे संधीसाधू आहेत. स्वार्थासाठी त्यांनी कितीवेळा भूमिका बदलली आहे, हे मोजणे शक्‍यच नाही' अशा शब्दांत राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी नितीशकुमार यांच्यावर टीका केली. बिहारमधील आघाडी तोडून नितीशकुमार यांनी थेट भाजपशी हातमिळविणी करत पुन्हा सत्ता मिळविली. नितीशकुमार यांच्या या खेळीमुळे बिहारमधील सर्वांत मोठा राजकीय पक्ष असलेल्या राजदला सत्तेबाहेर जावे लागले. 

या घडामोडींनंतर नितीशकुमार आणि लालूप्रसाद यादव यांच्यात शाब्दिक चकमकी सुरू आहेत. या पार्श्‍वभूमीवर पत्रकार परिषदेत लालूप्रसाद यादव म्हणाले, "'नितीशकुमार हे 'पलटूराम' आहेत. सत्तेसाठी त्यांनी असंख्यवेळा स्वत:ची भूमिका बदलली आहे. शिवाय, आता ते दावा करत आहेत, की 2015 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांच्यामुळे मला (राजद) मते मिळाली. असा दावा करताना नितीश यांना लाजही वाटत नाही. मी त्यांच्यापेक्षा वरिष्ठ असूनही ते असे बोलत आहेत.'' 

'विद्यार्थी राजकारणातून नितीशकुमार यांना मीच मुख्य प्रवाहात आणले. आता नितीश यांनी स्वार्थासाठी माझा वापर करून घेतला' असेही लालूप्रसाद म्हणाले. 

Web Title: marathi news marathi website Nitish Kumar Lalu Prasad Yadav Bihar Politics