सेन्सॉर बोर्डातील 'संस्कारी' पर्व संपले; निहलानींची हकालपट्टी 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

नवी दिल्ली : देशातील चित्रपटसृष्टीच्या 'शुद्धीकरणा'च्या प्रयत्नांमुळे सतत वादग्रस्त ठरलेल्या पहलाज निहलानी यांची अखेर सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदावरून केंद्र सरकारने हकाटपट्टी केली. त्यांच्या जागी गीतकार आणि पटकथालेखक प्रसून जोशी यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. जोशी यांच्यासह अभिनेत्री विद्या बालनलाही सेन्सॉर बोर्डाचे सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. 

निहलानी यांच्याकडे सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्षपद आल्यापासून ही संस्था सतत वादाच्या केंद्रस्थानीच राहिली. 'उडता पंजाब', 'लिपस्टिक अंडर माय बुरखा'पासून थेट जेम्स बॉंडच्या 'स्पेक्‍टर'पर्यंतचे चित्रपट निहलानींच्या नियमांच्या कचाट्यात सापडले होते. निहलानींकडे ही जबाबदारी 19 जानेवारी 2015 पासून होती. या कालावधीमध्ये त्यांच्या वादग्रस्त निर्णयांमुळे ते सतत चर्चेत राहिले. तसेच, अशोक पंडित यांच्यासारख्या सेन्सॉर बोर्डाच्या इतर सदस्यांशीही त्यांचे वाद झाले होते. 

निहलानींच्या जागी नियुक्ती झालेले प्रसून जोशी नामवंत गीतकार आणि पटकथा लेखक आहेत. 'तारें जमीन पर', 'भाग मिल्खा भाग', 'नीरजा', 'रंग दे बसंती'सारख्या चित्रपटांसाठी त्यांनी काम केले आहे. 'तारें जमीन पर'मधील 'मॉं' आणि 'चितगाव'मधील 'बोलो ना' या गाण्यासाठी जोशी यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. 

Web Title: marathi news marathi website Pahlaj Nihalani Prasoon Joshi Censor Board