माजी सीबीआय प्रमुखांविरुद्ध तपासात ठोस प्रगती : एसआयटी 

पीटीआय
सोमवार, 15 जानेवारी 2018

नवी दिल्ली : कोळसा गैरव्यवहाराशी संबंधित केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) माजी प्रमुख रणजित सिन्हा यांच्याविरुद्धच्या प्रकरणाच्या तपासात ठोस प्रगती झाली असल्याचे विशेष तपास पथकाने (एसआयटी) आज सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केले.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालया (ईडी)द्वारा केल्या जाणाऱ्या तपासातील प्रगती संथ असल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली. 

सिन्हा यांना त्यांच्या निवासस्थानी भेटणाऱ्या लोकांची संख्या डायरीमध्ये नोंदविण्यात आलेल्या संख्येपेक्षा अधिक होती आणि त्याचा तपास सुरू आहे. सिन्हा यांच्या निवासस्थानी नियमित येणाऱ्या वाहनांचा ठावठिकाणा शोधण्याचाही प्रयत्न केला जात असल्याचे एसआयटीने न्यायालयाला सांगितले. 

न्यायाधीश मदन बी. लोकूर, न्यायाधिश कुरियन जोसेफ आणि न्यायाधिश ए. के. सिक्री यांच्या विशेष खंडपीठाने सांगितले, की कोळसा गैरव्यवहार प्रकरणात सीबीआय आणि ईडीच्या तपासाची प्रगती संथ आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून नियुक्त विशेष वकील आर. एस. चीमा यांनी या प्रकरणाचा तपास आणि सीबीआयचे माजी संचालक रणजित सिन्हा यांचा सहभाग असलेल्या प्रकरणाच्या प्रगतीची माहिती पीठाला दिली. त्यांनी सीबीआयचे संचालक अलोक वर्मा यांच्या अध्यक्षतेखालील विशेष तपास पथकाचा प्रगती अहवाल सादर केला. पीठाने सर्व माहिती मिळाल्यानंतर या प्रकरणाच्या तपासाची पुढील प्रगती पाहण्यासाठी मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत सुनावणी स्थगित केली.

Web Title: marathi news marathi websites Coal gate scam CBI Ranjit Sinha Supreme Court