राज्यसभेचं तिकीट न मिळाल्याने 'आप'चे कुमार विश्वास रूसले

वृत्तसंस्था
बुधवार, 3 जानेवारी 2018

नवी दिल्ली : 'आम आदमी पक्षा'चे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांचे पक्षाच्या स्थापनेपासूनचे सहकारी कुमार विश्‍वास यांना राज्यसभेची उमेदवारी नाकारल्यानंतर 'आप'मधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. 'सत्य सांगण्याची शिक्षाच मला मिळाली आहे' अशी भावना विश्‍वास यांनी व्यक्त केली. 

नवी दिल्ली : 'आम आदमी पक्षा'चे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांचे पक्षाच्या स्थापनेपासूनचे सहकारी कुमार विश्‍वास यांना राज्यसभेची उमेदवारी नाकारल्यानंतर 'आप'मधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. 'सत्य सांगण्याची शिक्षाच मला मिळाली आहे' अशी भावना विश्‍वास यांनी व्यक्त केली. 

अण्णा हजारे यांच्या लोकपाल आंदोलनापासून विश्‍वास आणि केजरीवाल सहकारी आहेत. या आंदोलनानंतर केजरीवाल यांनी राजकारणात उडी घेत राजकीय पक्षाची स्थापना केली, तेव्हाही विश्‍वास त्यांच्याबरोबर होते. पण गेल्या काही महिन्यांपासून विश्‍वास आणि केजरीवाल यांच्यात मतभेद झाले होते. दिल्लीत 'आप'ला दणदणीत विजय मिळाल्यामुळे यंदा राज्यसभेवर तीन जागा निवडून आणण्याची संधी त्यांना होती. यामुळे कुमार विश्‍वास यांना राज्यसभेवर जाण्याची संधी मिळण्याची शक्‍यता होती. 

पण 'आप'तर्फे सनदी लेखापाल एन. डी. गुप्ता, व्यावसायिक सुशील गुप्ता आणि पक्षाचे नेते संजयसिंह यांना खासदारपदासाठी नामांकन देण्यात आले. राज्यसभेची निवडणूक 16 जानेवारी रोजी होणार आहे. 

'राज्यसभेवर विश्‍वास यांना संधी देण्याबाबत पक्ष नेतृत्त्वाला शंका होती. राज्यसभेत खासदार झाल्यानंतर विश्‍वास यांनी 'आप'वरच टीका करायला सुरवात केली तर काय, अशीही एक शक्‍यता होती' अशी माहिती 'आप'च्या एका नेत्याने दिली. 'विश्‍वास हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एजंट आहेत' असा आरोप 'आप'चे आमदार अमानतुल्ला खान यांनी केला होता. यावर विश्‍वास यांनी आक्षेप घेत खान यांची हकालपट्टी करण्याची मागणी लावून धरली होती. 

Web Title: marathi news marathi websites Delhi News Arvind Kejriwal Kumar Vishwas Rajya Sabha