स्वराज यांच्याकडून पुन्हा मदतीचा हात 

पीटीआय
शनिवार, 28 ऑक्टोबर 2017

नवी दिल्ली : परदेशात अडचणीत असलेल्या भारतीयांच्या मदतीला तातडीने प्रतिसाद देणाऱ्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आज पुन्हा एकदा एका भारतीय कुटुंबाला अडचणीतून सोडविले.

मलेशियाच्या विमानतळावर पासपोर्ट हरविलेल्या भारतीय कुटुंबाला योग्य ते सहकार्य करण्याच्या सूचना स्वराज यांनी येथील भारतीय दूतावासाला आज दिल्या. 

मीरा रमेश पटेल यांचे कुटुंब मलेशियामधील विमानतळावर असताना त्यांचे पासपोर्ट हरविले. त्यामुळे त्यांनी ट्‌विटरवरून सुषमा स्वराज यांच्याशी संपर्क साधत मदतीचे आव्हान केले. शनिवार असल्याने भारतीय दूतावासही बंद असल्याचे पटेल यांनी स्वराज यांना कळविले. यावर सुषमा यांनी तातडीने प्रतिसाद देत मलेशियातील भारतीय दूतावासाला कार्यालय उघडून या कुटुंबाला मदत करण्यास सांगितले.

यानंतर भारतीय दूतावासाने संबंधित कुटुंबीयांशी संपर्क साधून त्यांची अडचण सोडविण्याची प्रक्रिया सुरू केली. 

काही दिवसांपूर्वीही अमेरिकेत शिकणाऱ्या अनुषा धुलिपाला या विद्यार्थिनीचा पासपोर्ट हरविला होता आणि त्याच काळात तिची परीक्षा असल्याने भारतात येऊन प्रक्रिया करणे शक्‍य नव्हते. या वेळीही तिने स्वराज यांच्याशी संपर्क साधला असता स्वराज यांनी वॉशिंग्टनमधील भारतीय दूतावासाला मदत करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

Web Title: marathi news marathi websites Delhi News Modi Government Sushma Swaraj