पदकविजेत्या खेळाडूंसाठी सचिन तेंडुलकर यांचे मोदी यांना पत्र 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 12 डिसेंबर 2017

नवी दिल्ली : राज्यसभेचे खासदार व क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आंतरराष्ट्रीय पदकविजेत्या सर्व भारतीय खेळाडूंना केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेत (सीजीएचएस) सामील करून घेण्याची मागणी केली आहे. सचिननेच ही मागणी केल्याने ती मान्य होण्याचे संकेत भाजप गोटातून मिळाले आहेत. जे. पी. नड्डा यांच्या आरोग्य मंत्रालयाच्या बाबूशाहीने याबाबत वाटाण्याच्या अक्षता लावल्यावर सचिनला पंतप्रधानांकडे धाव घ्यावी लागली आहे. 

'सीजीएचएस' योजनेतील लाभार्थींना साऱ्या सरकारी रुग्णालयांत माफक दरांत उपचार मिळावेत, असा कागदोपत्री नियम आहे. या योजनेतील लाभार्थींमध्ये आजी-माजी खासदार, लाखो सरकारी बाबू व अगदी दिल्लीतले अधिस्वीकृतीधारक पत्रकारही येतात. मात्र खेळाडूंना त्याचा लाभ मिळत नाही. सचिन यांनी याबाबतच मोदींबरोबर हा पत्रव्यवहार केला आहे. 

सचिन यांनी मोदींना नुकतेच पत्र लिहिले. ता. 24 नोव्हेंबरला लिहिलेल्या या पत्रात सचिन यांनी पदकविजेत्या खेळाडूंनाही सरकारी आरोग्य सेवा मिळण्याबाबत पंतप्रधानांना साकडे घातले आहे. हॉकीच्या सुवर्णपदक विजेत्या संघातील खेळाडू महंमद शाहीद यांचे अखेरच्या दिवसांत उपचार न परवडल्याने हाल झाले त्याचेही उदाहरण सचिन यांनी दिले आहे.

देशासाठी पदक मिळवून देशाचा गौरव वाढविणाऱ्या अनेक खेळाडूंवर वृद्धावस्थेत करुण अवस्था ओढवते, ती टाळण्यासाठी पंतप्रधानांनी लक्ष घालावे व 'सीजीएचएस' योजनेचे लाभ पदक विजेत्यांनाही मिळावेत अशी मागणी त्यांनी केली आहे. देशातील सर्व खेळाडूंच्या वतीने मी ही मागणी करत आहे असे नमूद करून सचिन यांनी पत्रात म्हटले आहे, की यापूर्वी मी हा मुद्दा संरक्षण व आरोग्य मंत्रालयांनाही कळविला होता. आरोग्य मंत्रालयाने माझ्या मागणीला पाठिंबा दिला. मात्र, 14 सप्टेंबरला आपल्याला लिहिलेल्या पत्रात या मंत्रालयाने ही योजना विस्तारित स्वरूपात लागू करण्याबाबत असमर्थता व्यक्त केली आहे.

Web Title: marathi news marathi websites Delhi News Sachin Tendulkar Narendra Modi