रोहिंग्यांच्या समर्थनार्थ गोव्यात मोर्चा काढणारे कोण?; हिंदुत्ववादी संघटनांचा सवाल

मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

पणजी (गोवा) : 'समान नागरी कायदा लागू असलेले देशातील एकमेव राज्य' अशी ओळख असलेल्या गोव्यातील धार्मिक व सामाजिक सलोख्याचे वातावरण रोहिंग्या मुसलमानांच्या प्रश्‍नावरून ढवळून निघते की काय अशी स्थिती उद्‌भवली आहे.

'रोहिंग्यांना देशातून हाकलू नये' म्हणून गोव्यात तीन ठिकाणी फेऱ्या काढण्यात आल्या. त्यामुळे धार्मिक सलोखा बिघडेल असा दावा करत अशा फेऱ्या काढणाऱ्यांचीच चौकशी करावी, अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी आज पोलिस उपमहानिरीक्षकांकडे निवेदन सादर करून केली. 

पणजी (गोवा) : 'समान नागरी कायदा लागू असलेले देशातील एकमेव राज्य' अशी ओळख असलेल्या गोव्यातील धार्मिक व सामाजिक सलोख्याचे वातावरण रोहिंग्या मुसलमानांच्या प्रश्‍नावरून ढवळून निघते की काय अशी स्थिती उद्‌भवली आहे.

'रोहिंग्यांना देशातून हाकलू नये' म्हणून गोव्यात तीन ठिकाणी फेऱ्या काढण्यात आल्या. त्यामुळे धार्मिक सलोखा बिघडेल असा दावा करत अशा फेऱ्या काढणाऱ्यांचीच चौकशी करावी, अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी आज पोलिस उपमहानिरीक्षकांकडे निवेदन सादर करून केली. 

''शांतताप्रिय आणि सांप्रदायिक ऐक्य असलेल्या गोव्यात दहशतवाद्यांशी संबंध असलेल्या रोहिंग्या मुसलमानांच्या समर्थनार्थ तीन ठिकाणी फेर्‍या काढण्यामागील हेतू काय होता?  या फेर्‍यांना पोलीस आणि प्रशासन यांनी कोणत्या आधारावर परवानगी दिली? या फेर्‍यांच्या आयोजनासाठी निधी कुठून पुरवला गेला? गोव्यात फेरी काढणारे आणि राष्ट्रविघातक रोहिंग्या यांचा कोणता संबंध आहे? या सर्व गोष्टींचा पोलिसांनी तातडीने शोध घ्यावा,'' अशी मागणी राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी म्हणवणाऱ्या नागरिकांनी गोवा राज्याचे पोलीस उपमहानिरीक्षक विमल गुप्ता यांच्याकडे केली आहे.

देशात रोहिंग्यांना आश्रय न देण्याच्या मागणीला अनुसरून डिचोली येथे ८ ऑक्टोबर या दिवशी झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनानंतर विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी पोलीस उपमहानिरीक्षक विमल गुप्ता यांची भेट घेतली.

शिष्टमंडळामध्ये गोमंतक मंदिर आणि धार्मिक संस्था महासंघाचे अध्यक्ष  चंद्रकांत (भाई) पंडित, भारत स्वाभिमानचे  कमलेश बांदेकर, शिवसेनेचे माजी राज्यप्रमुख रमेश नाईक, छत्रपती शिवाजी महाराज संघटनेचे  किरण नाईक, वाळपई येथील शिवप्रेमी संघटनेचे विश्‍वराज सावंत आणि हिंदु जनजागृती समितीचे  जयेश थळी यांचा सहभाग होता. पोलीस उपमहानिरीक्षक विमल गुप्ता यांनी या प्रकरणात लक्ष घालणार असल्याचे आश्‍वासन दिले. शिष्टमंडळाने यानंतर उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकारी नीला मोहनन् यांचीही भेट घेऊन त्यांनाही रोहिंग्यांच्या समर्थनार्थ गोव्यात निघालेल्या फेर्‍यासंदर्भात माहिती देण्यात आली. जिल्हाधिकारी मोहनन् यांनीही शिष्टमंडळाची म्हणणे ऐकून आवश्यक कृती करणार असल्याचे सांगितले.

शिष्टमंडळाने पोलीस उपमहानिरीक्षक विमल गुप्ता यांच्या नजरेस आणून दिले की, गोव्यात बांगलादेशी घुसखोर नागरिक अधिकोषांच्या ‘एटीएम्’च्या चोर्‍यांमध्ये सहभागी झाल्याचे नुकतेच उघडकीस आले आहे. जिहादी दहशतवादी यासीन भटकळ यालाही पूर्वी गोव्यात  पकडण्यात आले होते. गोव्यात रोहिंग्याच्या समर्थनार्थ ज्या फेर्‍या झाल्या त्याचा आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेशी काय संबंध होता याचाही शोध घेतला पाहिजे. रोहिंग्यांच्या समर्थनार्थ वास्को येथे फेरीचे आयोजन करणार्‍या ‘प्रोग्रेसिव्ह मुस्लीम फ्रंट’ आणि रोहिंग्या यांचा काय संबंध आहे, याचाही शोध पोलिसांनी घेणे आवश्यक आहे. गोवा पोलीस सावधानता बाळगण्याच्या अनुषंगाने आताच रोहिंग्यांचे समर्थन करणार्‍यांवर कारवाई करणार कि पुढे मोठी अप्रिय घटना घडण्याची वाट पहाणार, असा प्रश्‍नही या वेळी शिष्टमंडळाने उपस्थित केला.

भारताच्या सुरक्षेला घातक असलेल्या रोहिंग्या मुसलमानांना भारतात प्रवेश देऊ नये, आजवर भारतात आलेल्या रोहिंग्या मुसलमानांना त्वरित देशाबाहेर काढावे आणि म्यानमारमधील विस्थापित हिंदूंवर अत्याचार करून त्यांचे धर्मांतर करणार्‍या रोहिंग्या मुसलमानांचे समर्थन करून जातीय तणाव निर्माण करणार्‍या भारतातील मुसलमानांना कोणतेही आंदोलन करण्यास अनुमती देऊ नये, अशा मागण्या करणारे निवेदनही या वेळी पोलीस उपमहानिरीक्षकांना देण्यात आले. या निवेदनाची मूळ प्रत केंद्रीय गृहमंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालय यांना पाठवण्यात आली आहे.

Web Title: marathi news marathi websites Goa News Rohingya India Panjim