हिमाचल प्रदेशमध्ये सत्ता आली; पण भावी मुख्यमंत्री पराभवाच्या छायेत

वृत्तसंस्था
सोमवार, 18 डिसेंबर 2017

नवी दिल्ली : गुजरातच्या 'हेवी वेट' लढतीमध्ये काहीसे दुर्लक्षच झालेल्या हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीमध्ये भाजपने सहज बहुमत मिळविले असले, तरीही या राज्यातील मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार प्रेमकुमार धुमल यांना पराभवाचा अनपेक्षित धक्का सहन करावा लागू शकतो, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आज (सोमवार) सकाळी 10.20 पर्यंत समोर आलेल्या मतमोजणीच्या कलानुसार, प्रेमकुमार धुमल 1,709 मतांनी पिछाडीवर आहेत. 

हिमाचल प्रदेशमधील काँग्रेसची सत्ता हटविण्यात भाजपला यश आले आहे. पण या मोहिमेचे नेतृत्त्व केलेल्या धुमल यांना पिछाडीवर जावे लागल्याने भाजपला हलका धक्का बसू शकतो. अनुभवी धुमल यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून 'प्रोजेक्‍ट' केले जात होते. 

धुमल यांना पिछाडी भरून काढण्यात अपयश आल्यास सत्ता मिळूनही 'मुख्यमंत्री कोण' या प्रश्‍नाला भाजपला सामोरे जावे लागू शकते. अशा वेळी ज्येष्ठ केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा किंवा तरुण खासदार अनुराग ठाकूर यांचा पर्याय भाजप नेतृत्त्वासमोर असू शकतो. मात्र, नड्डा आणि ठाकूर दोघेही खासदार असल्याने सत्ता येऊनही भाजपला हिमाचल प्रदेशमध्येही उत्तर प्रदेश आणि गोव्याचा कित्ता गिरवावा लागू शकतो. गोव्यामध्ये मनोहर पर्रीकर यांना केंद्रातून राज्यात पाठविण्यात आले होते; तर उत्तर प्रदेशमध्ये सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्रीपदी खासदार योगी आदित्यनाथ यांना नियुक्त करण्यात आले होते. 

Web Title: marathi news marathi websites Gujarat Elections Narendra Modi Himachal Pradesh Elections Prem Kumar Dhumal