गुजरात निवडणुकीत दुसऱ्या टप्प्यात 66 टक्के मतदान 

वृत्तसंस्था
गुरुवार, 14 डिसेंबर 2017

अहमदाबाद : गुजरात विधानसभेच्या दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील 93 जागांसाठी आज सायंकाळपर्यंत 66 टक्के एवढे मतदान झाले. मेहसाणा, आणंद आणि बडोद्यातील किरकोळ हिंसाचाराच्या घटना वगळता उर्वरित ठिकाणांवर शांततेत मतदान पार पडले.

उत्तर आणि मध्य गुजरातमधील तब्बल 2 कोटी 22 लाख लोकांनी मतदानाचा हक्क बजावल्याचा अंदाज निवडणूक आयोगाने वर्तविला आहे. पहिल्या टप्प्याप्रमाणे याही टप्प्यात काही ठिकाणांवर इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाला होता. पण आयोगाने तातडीने येथील यंत्रे बदलल्यानंतर मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली.

पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरून आज पुन्हा नव्या वादाला तोंड फुटले. कॉंग्रेसने या रोड शोला तीव्र आक्षेप घेत हा निवडणूक आचारसंहितेचा भंग असल्याची टीका केली. भाजपने मात्र पुन्हा या शोचे समर्थन केले आहे. 

Web Title: marathi news marathi websites Gujarat Elections Narendra Modi Rahul Gandhi Gujarat Results