हो.. मी राजकीय तज्ज्ञ आहे; निवडणुकीतलं मला सगळं कळतं!

हो.. मी राजकीय तज्ज्ञ आहे; निवडणुकीतलं मला सगळं कळतं!

गुजरातच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांकडे संपूर्ण देशाचे लक्ष असणे स्वाभाविकच होते.. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या घरच्या मैदानावर कॉंग्रेस काय कमाल करून दाखवणार, याकडे विविध राजकीय पक्षांसह देशभरातील राजकीय विश्‍लेषकांचेही बारीक लक्ष होते. 

गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू होण्याआधीपासूनच विविध वृत्तवाहिन्यांवर राजकीय विश्‍लेषक सज्ज होते. या सगळ्यावर लक्ष असलेल्या ट्‌विटरकरांनी या तज्ज्ञांची खिल्ली उडवली नसती, तरच नवल होते.. 

गुजरातमधील मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात भाजपने आघाडी घेतली आणि सकाळी 9.00 च्या सुमारा कॉंग्रेसने आश्‍चर्याचा धक्का देत भाजपवर आघाडी घेतली. त्यानंतर भाजपने पुन्हा मुसंडी मारत आघाडी घेतली आणि बहुमताच्याही पुढे गेले.

या सगळ्या कालावधीत सगळेच राजकीय विश्‍लेषक बाह्या सरसावून आपले मत अत्यंत ठामपणे मांडत होते.

इतक्या 'क्लोज फाईट'नंतर गुजरातमध्ये सहाव्यांदा सत्ता मिळविल्यानंतर भाजपच्या मुख्यालयातलं वातावरण कसं असेल, याचा अंदाजही ट्विटरवर वर्तविण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com