मोदी जैसा कोई नही..! : योगी आदित्यनाथ

File photo of Narendra Modi
File photo of Narendra Modi

लखनौ : 'भारतामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाला आव्हान देणारे सध्या कुणीही नाही' अशा शब्दांत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज (सोमवार) पंतप्रधानांचे कौतुक केले. पंतप्रधान मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या जोडीने गुजरातचा गड राखत काँग्रेसला पुन्हा एकदा धक्का दिला. 

गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी या विजयाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली. प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना योगी आदित्यनाथ यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांचेही तोंडभरून कौतुक केले. 

योगी आदित्यनाथ म्हणाले, "काँग्रेसचे नवे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नियुक्तीचा भाजपला फायदाच होत आहे. शिवाय काँग्रेसने सातत्याने गुजराच्या विकासावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. याचाही फटका त्यांना बसला. जगभरात सगळीकडे पंतप्रधान मोदी यांचे कौतुक होत असते. पण काँग्रेसने त्यालाच आव्हान दिले. हा निकाल म्हणजे काँग्रेस आणि विरोधी पक्षांना धडाच आहे.'' 

गुजरात, हिमाचल प्रदेश निवडणुकीचे ई सकाळवरील कव्हरेज:

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com