काँग्रेस आमदार बंडाच्या पवित्र्यात

उज्ज्वलकुमार
बुधवार, 20 डिसेंबर 2017

पाटणा : गुजरात विधानसभा निवडणुकीत नैतिक विजयाचा दावा करणाऱ्या काँग्रेसला बिहारमध्ये मोठ्या सत्त्वपरीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. येथे पक्षातील 27 पैकी एक डझन आमदार संयुक्त जनता दल आणि भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लालूप्रसाद यादव यांच्यासोबतच्या संबंधांबाबत ठोस भूमिका घ्यावी, असे या आमदारांचे म्हणणे आहे. 

यंदा जुलै महिन्यात सत्तेचे समीकरण बदलताच काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल हे दोन्ही पक्ष विरोधकांच्या भूमिकेत गेले आहेत. काँग्रेस आमदारांचा एक गट लालूप्रसाद यांचा कट्टर विरोधक मानला जातो. अनेक भ्रष्टाचारांमध्ये सहभाग असणाऱ्या लालूंसोबत राहिलो तर याचा मोठा फटका पक्षाच्या प्रतिमेला बसू शकतो, असे या आमदारांना वाटते. स्थानिक मतदारसंघांतही लालूफॅक्‍टर डोकेदुखी ठरत असल्याने या आमदारांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. स्वच्छ प्रतिमेचे राहुल गांधी हे पक्षाचे अध्यक्ष बनले आहेत, त्यामुळे त्यांनी लालूंसोबतचे संबंध तोडावेत, असे अनेक आमदारांना वाटते. 

लालूंचा निवाडा 
पशुखाद्य गैरव्यवहारप्रकरणी लालूप्रसाद यादव यांच्या खटल्याचा निकाल 23 डिसेंबर रोजी येणार असून, झारखंडमधील विशेष न्यायालयातील या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली आहे. लालूप्रसाद यांनी मात्र आपण तुरुंगामध्ये जाण्यास घाबरत नाही, असे म्हटले आहे. पशुखाद्य गैरव्यवहारातील हा दुसरा मोठा खटला आहे. हा निकाल लालूंच्याविरोधात गेल्यास त्यांच्या अडचणी आणखी वाढू शकतात.

Web Title: marathi news marathi websites Gujarat Elections Rahul Gandhi Bihar Congress