आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करा : हार्दिक पटेल यांची काँग्रेसला मुदत 

पीटीआय
रविवार, 29 ऑक्टोबर 2017

अहमदाबाद : पाटीदार समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावर काँग्रेसने तीन नोव्हेंबरपूर्वी आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हान पाटीदार अनामत आंदोलन समितीचे नेते हार्दिक पटेल यांनी आज काँग्रेसला दिले. 

तीन नोव्हेंबर रोजी सूरत येथील सभेत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह व्यासपीठावर उपस्थित राहण्यास हार्दिक यांनी तयारी दर्शविली असल्याचे संकेत काँग्रेसकडून देण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर भूमिका स्पष्ट करण्याची मागणी हार्दिक यांनी काँग्रेसकडे केली आहे. हार्दिक यांनी आज या संदर्भात 'ट्विट' केले आहे. 

आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या पाटीदार समाजाचा पाठिंबा मिळविण्याचे प्रयत्न काँग्रेसकडून करण्यात येत आहेत. आपण काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार असल्याचे सूतोवाच हार्दिक यांनी या पूर्वीच केले आहेत. मात्र तीन नोव्हेंबरच्या कार्यक्रमापूर्वी पाटीदार समाजाच्या आरक्षणाबाबत काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट करावी, असा आग्रह हार्दिक यांनी धरला आहे. या माध्यमातून काँग्रेसची कोंडी करण्याचे हार्दिक यांचे प्रयत्न आहेत, असे मानले जाते.

पाटीदार समाजाला आरक्षण देण्यास आपला पाठिंबा असल्याचे काँग्रेसने म्हटले असले, तरी किती टक्के आरक्षण देण्यात यावे याबाबत मौन बाळगले आहे. 

गुजरातमधील राजकीय वातावरण सध्या प्रचंड प्रमाणात तापले असून, पाटीदार समाजाच्या आंदोलनाचा निवडणुकीत फटका बसून नये म्हणून भाजपकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. मात्र भाजपविरोधी भूमिकेवर हार्दिक अद्यापही ठाम आहेत.

Web Title: marathi news marathi websites Gujrat Elections BJP Narendra Modi Amit Shah Hardik Patel Congress