वर्षभरात पाकिस्तानचे 138 सैनिक ठार

पीटीआय
बुधवार, 10 जानेवारी 2018

नवी दिल्ली : मागील वर्षभरात सीमेवरील पाकिस्तानच्या कुरापतींना भारतीय लष्कराने सडेतोड उत्तर दिले आहे. लक्ष्यभेदी हल्ले आणि प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारामध्ये 138 पाकिस्तानी सैनिक ठार झाले असून, 155 पाकिस्तानी रेंजर्स जखमी झाले आहेत, अशी माहिती गुप्तचर संस्थांनी आज दिली.

या कारवाईमध्ये भारताचेही 28 जवान हुतात्मा झाले असून, 70 जण जखमी झाले आहेत. 

सर्वसाधारणपणे पाकिस्तान सरकार कधीच त्यांचे सैनिक मरण पावल्याची बाब मान्य करत नाही, याचा समावेश ते नागरी जीवितहानीमध्ये करतात. जम्मू- काश्‍मीरमधील दहशतवादी कारवाया आणि शस्त्रसंधी उल्लंघनाबाबत मागील वर्षभरात भारत सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. भारताचे लष्कर पाकिस्तानला सडेतोड उत्तर देत असून, भविष्यामध्येही आमची ही भूमिका कायम राहणार असल्याचे लष्कराचे प्रवक्‍ते कर्नल अमन आनंद यांनी सांगितले. 

पाकचा इन्कार 
2017 मध्ये पाकिस्तानकडून 860 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले असून, याआधीच्या वर्षी हे प्रमाण केवळ 221 एवढे होते. सैनिकांच्या मृत्यूबद्दल पाकिस्तान सरकारचे मौन बरेच काही सांगून जाते. कारगिल युद्धाच्या वेळी भारताने पुरावे सादर केल्यानंतर देखील पाकिस्तानने त्यांची लष्करी हानी झाल्याची बाब मान्य केली नव्हती, असे सूत्रांनी सांगितले. 

अन्‌ ट्विट केले डिलीट 
25 डिसेंबर रोजी भारताच्या कमांडो पथकाने नियंत्रण रेषा ओलांडत पाकिस्तानच्या तीन सैनिकांना ठार केले होते. यानंतर पाकच्या लष्कराने ट्विटरवरून याची कबुली दिली होती; पण नंतर मात्र ते ट्विट डिलीट करण्यात आले होते. पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्‍त्यानेही दोनच दिवसांत पत्रकार परिषद घेऊन भारताने हल्ला केल्याची बाब फेटाळून लावली होती. 

स्नायपर टिपले 
वर्षभरात भारताच्या जवानांनी अचूक लक्ष्यभेद करत पाकिस्तानच्या 27 सैनिकांना (स्नायपर) ठार मारले होते, तर याच चकमकींत भारताचे सात जवान हुतात्मा झाले होते. पाकिस्तानी लष्कराच्या पाठिंब्याने चालणारी दहशतवाद्यांची केंद्रे नष्ट करण्याचा सपाटाच भारताने लावला आहे. मागील वर्षी मे महिन्यामध्ये पाकने दोन भारतीय जवानांची हत्या केल्यानंतर भारतानेही पाकच्या चौक्‍या नष्ट केल्या होत्या.

Web Title: marathi news marathi websites India Pakistan Indian Army