नोटाबंदी हे नैतिक पाऊल : जेटली 

पीटीआय
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

नवी दिल्ली : ''नोटाबंदी हे भ्रष्टाचार दूर करण्यासाठी उचललेले नैतिक पाऊल होते, लूट नव्हती,'' अशा शब्दांत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. टू जी गैरव्यवहार, राष्ट्रकुल स्पर्धा आणि कोळसा खाणवाटपात लूट करण्यात आली, अशी टीकाही त्यांनी केली. 

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ''नोटाबंदी हे काळ्या पैशांविरुद्ध उचललेले नैतिकदृष्ट्या योग्य पाऊल होते. जे नैतिकदृष्ट्या बरोबर असते ते राजकीयदृष्ट्याही बरोबरच असते. 'यूपीए' सरकारचा दहा वर्षांचा कार्यकाल म्हणजे धोरण लखव्याचे उदाहरण होते. मूलभूत सुधारणा करून पंतप्रधान मोदी देशाला विकसित राष्ट्र बनवत आहेत. स्वच्छ अर्थव्यवस्था बहाल करत आहेत.'' 

ते म्हणाले, ''भ्रष्टाचार दूर करण्यासाठी अर्थव्यवस्थेतील जैसे से स्थिती हलविण्याची गरज असल्याचे भाजपचे मत आहे. कॉंग्रेसच्या आधीच्या सरकारांनी काळ्या पैशाविरुद्ध अशा प्रकारे कोणतीही मोठी पावले उचलली नाहीत. कॉंग्रेसचे पहिले ध्येय एका कुटुंबाची सेवा करणे हे आहे, तर भाजप देशाची सेवा करू इच्छितो.'' 

नोटाबंदी फायद्यांबाबत बोलताना जेटली म्हणाले, ''करदात्यांची संख्या वाढवणे आणि व्यवस्थेत कमी रोकड ठेवणे हा यामागचा हेतू होता. व्यवस्थेत कमी असलेली रोकड कदाचित भ्रष्टाचार पूर्ण बंद करू शकत नाही; पण यामुळे भ्रष्टाचार करणे कठीण बनते. नोटाबंदीनंतर दहशतवाद्यांना मिळणारा अर्थपुरवठाही रोखला गेला.''

Web Title: marathi news marathi websites Indian Economy Demonetization Arun Jaitley