इंटरनेटचे स्पीड ग्राहकांसाठी कमीच 

पीटीआय
गुरुवार, 11 जानेवारी 2018

नवी दिल्ली : दूरसंचार कंपन्यांकडून केवळ इंटरनेट सेवेचा वेग अधिक असल्याचे दावे केले जात असले तरी प्रत्यक्षात ग्राहकांना मात्र हा वेग अतिशय कमी मिळत आहे, असे ग्राहक हक्कांसाठी काम करणाऱ्या एका कृती गटाने केलेल्या पाहणीत समोर आले आहे. 

नवी दिल्ली : दूरसंचार कंपन्यांकडून केवळ इंटरनेट सेवेचा वेग अधिक असल्याचे दावे केले जात असले तरी प्रत्यक्षात ग्राहकांना मात्र हा वेग अतिशय कमी मिळत आहे, असे ग्राहक हक्कांसाठी काम करणाऱ्या एका कृती गटाने केलेल्या पाहणीत समोर आले आहे. 

'कन्झ्युमर व्हाइस' या गटाने याबाबत पाहणी केली आहे. या गटात अनेक क्षेत्रांतील तज्ज्ञ आणि व्यावसायिकांचा समावेश आहे. ग्राहकांना सेवा खराब, सामान्य अथवा चांगल्या दर्जाची आहे, यातील फरक ओळखणे शक्‍य होत नसल्याचेही पाहणीत स्पष्ट झाले आहे. 'कन्झ्युमर व्हाइस'ने म्हटले आहे, की दूरसंचार कंपन्यांकडून ग्राहकांना जास्त वेगवान इंटरनेट दिल्याचा दावा करण्यात येतो. प्रत्यक्षात ग्राहकाला मिळणारा वेग कमी असतो. जगभरातील विचार करता हा वेग अतिशय कमी आहे. 

भारताचे 'डिजिटल इंडिया'त रूपांतर करताना इंटरनेट सेवेची गुणवत्ताही महत्वाची आहे. यामुळे सरकारने यात लक्ष घालून पावले उचलण्याची गरज आहे. भविष्यात चांगली इंटरनेट सेवा देण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असे 'कन्झ्युमर व्हाइस'ने नमूद केले आहे. 

कंपन्यांनुसार वेगही कमी जास्त 
देशभरातील चार दूरसंचार क्षेत्रात येणाऱ्या आठ राज्यांमध्ये ही पाहणी करण्यात आली. या पाहणीत ग्राहकांना अतिशय कमी वेगाने इंटरनेट मिळत असल्याचे समोर आले. सर्व दूरसंचार कंपन्याच्या 3जी आणि 4जी सेवांच्या वेगामध्येही तफावत आहे. इंटरनेटचा संथ वेग वाढविण्यासाठी सरकार आणि दूरसंचार नियामकांनी नियमावली आखण्याची आवश्‍यकता गटाने नमूद केली आहे.

Web Title: marathi news marathi websites Internet Speed