काश्‍मीरमध्ये चकमकीत दोन जवान हुतात्मा; दोन दहशतवादी ठार 

वृत्तसंस्था
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

श्रीनगर : उत्तर काश्‍मीरमधील बंदीपोरा येथे दहशतवाद्यांशी आज (बुधवार) पहाटे झालेल्या चकमकीत दोन जवान हुतात्मा झाले. या चकमकीत दोन दहशतवादीही ठार झाले. 

श्रीनगर : उत्तर काश्‍मीरमधील बंदीपोरा येथे दहशतवाद्यांशी आज (बुधवार) पहाटे झालेल्या चकमकीत दोन जवान हुतात्मा झाले. या चकमकीत दोन दहशतवादीही ठार झाले. 

बंदीपोरा येथील एका भागात आठ दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्याआधारे या भागात शोधमोहीम राबविली जात होती. यात लष्कर आणि जम्मू-काश्‍मीर पोलिस दलाच्या जवानांचा सहभाग होता. या पथकावर दहशतवाद्यांनी पहाटे पाचच्या सुमारास गोळीबार सुरू केला. या गोळीबारात काही जवान जखमी झाले, तर दोघे हुतात्मा झाले. हुतात्मा झालेले दोन्ही जवान हवाई दलाच्या 'गरुड' विभागातील आहेत. हे दोघेही सध्या लष्कराच्या तुकडीमध्ये प्रशिक्षणासाठी दाखल झाले होते. 

या चकमकीमध्ये दोन दहशतवादीही ठार झाले आहेत. अद्याप या दहशतवाद्यांची ओळख पटू शकलेली नाही. मात्र, सीमा सुरक्षा दलातील जवान रमझान परे यांच्या हत्येमागे दहशतवाद्यांचा हाच गट असल्याचा संशय सुरक्षा दलांना आहे. 

Web Title: marathi news marathi websites Jammu Kashmir News Kashmir Terrorism Bandipora encounter India Army