रेशनवरील धान्यासाठी आधार सक्तीचे नाही 

पीटीआय
शनिवार, 21 ऑक्टोबर 2017

जमशेदपूर : रेशनवरील धान्य मिळविण्यासाठी आधार कार्ड सक्तीचे नसल्याचे आज झारखंड सरकारने स्पष्ट केले. 11 वर्षांच्या मुलीचा नुकताच भुकेमुळे मृत्यू झाल्याची घटना येथे घडली होती. आधार कार्ड न जोडल्यामुळे रेशनवरील धान्य मृत मुलीच्या नातेवाइकांना नाकारण्यात आले होते. त्यामुळे 28 सप्टेंबर रोजी या मुलीचा भुकेने बळी गेला, असा आरोप स्थानिक कार्यकर्त्यांनी केला. 

रेशनवरील धान्य मिळविण्यासाठी आधार कार्ड सक्तीचे नसून वाहनचालक परवाना, मतदार कार्ड हे रेशनवरील धान्य मिळविण्यासाठीसुद्धा चालणार आहे, असे राज्याचे अन्नधान्यमंत्री सरयू रॉय यांनी सांगितले.

रेशनवरील धान्य वितरकांविरुद्ध तक्रार करण्यासाठी 180021255 12 हा टोलफ्री क्रमांक देण्यात आला आहे, असे रॉय म्हणाले. त्याशिवाय प्रत्येक ब्लॉकमध्ये अन्नधान्य बॅंक स्थापन करण्यात येणार आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री रधुबीर दास यांनी 17 ऑक्‍टोबर रोजी जाहीर केलेल्या नव्या चौकशीमध्ये संबंधित मुलीचा मृत्यू हा मलेरियाने झाल्याचे आढळून आले आहे, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. 

Web Title: marathi news marathi websites Jharkhand Aadhar Card Ration Card