प्रत्येक दलिताला पाच एकर जमीन द्या : जिग्नेश मेवानी 

वृत्तसंस्था
गुरुवार, 18 जानेवारी 2018

हैदराबाद : 'जवळपास 70 टक्के दलित भूमिहीन आहेत. त्यामुळे प्रत्येक दलिताला पाच एकर जमीन दिली पाहिजे', अशी मागणी गुजरातमधील आमदार आणि दलित नेते जिग्नेश मेवानी यांनी केली. येथील तुरुंगात असलेले दलित नेते मंदा कृष्ण मडिगा यांची भेट घेतल्यानंतर मेवानी यांनी ही मागणी केली. 

'दलितांच्या उद्धारासाठी समविचारी नेते एकत्र येणार आहेत आणि आम्ही देशव्यापी आघाडी उभी करणार आहोत' अशी माहितीही मेवानी यांनी दिली. मडिगा यांची भेट घेतल्यानंतर मेवानी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अनुसूचित जमातींच्या वर्गीकरणाच्या मागणीसाठी परवानगी नसताना मोर्चा काढल्यामुळे मडिगा यांना पोलिसांनी अटक केली आहे. 

"जमीन हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. गुजरातमध्ये प्रत्येक दलिताला पाच एकर जमीन दिली जावी, अशी माझी मागणी आहे; तर प्रत्येक दलिताला तीन एकर जमीन द्यावी, अशी मडिगा यांची मागणी आहे'', असे मेवानी म्हणाले. 

मेवानी म्हणाले, "येत्या काही दिवसांमध्ये आम्ही दलितांसाठी देशव्यापी आघाडी उभी करणार आहोत. यात माझ्यासह मडिगा आणि इतर पुरोगामी, दलित नेते सहभागी होणार आहेत.'' मडिगा यांच्या अटकेचाही मेवानी यांनी निषेध केला. 'तेलंगणा सरकार आणि पोलिसांनी मडिगा यांची सुटका करावी. मडिगा हे त्यांच्या समूहाच्या घटनात्मक हक्कांसाठी झगडत आहेत. एखाद्याच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर अशी गदा आणू नये' असे मेवानी म्हणाले. 

रोहित वेमूलाची व्यवस्थेकडून हत्या झाली नसती, तर तोदेखील आज माझ्याबरोबर मडिगा यांच्या भेटीला आला असता. दलितांवर होत असलेल्या अत्याचारांची किंमत मोदी सरकारला मोजावी लागेल. 
- जिग्नेश मेवानी, दलित नेते

Web Title: marathi news marathi websites Jignesh Mevani Dalit