कमल हसन यांचा राजकारण प्रवेश 21 फेब्रुवारीला!

वृत्तसंस्था
बुधवार, 17 जानेवारी 2018

चेन्नई : ज्येष्ठ अभिनेते कमल हसन येत्या 21 फेब्रुवारी रोजी त्यांच्या राजकीय पक्षाची अधिकृत घोषणा करणार आहेत. रामनाथपूरम या हसन यांच्या जन्मगावी सभा घेऊन ते राजकीय कारकिर्दीची सुरवात करणार आहेत. 

कमल हसन यांनी काल (मंगळवार) रात्री एक पत्रक प्रसिद्ध करून ही माहिती दिली. नव्या राजकीय पक्षाचे नावही 21 फेब्रुवारी रोजीच जाहीर होणार आहे. 'तमिळनाडूच्या राजकारणातील 'जैसे थे' परिस्थिती बदलणे हा राजकीय पक्षाचा मुख्य हेतू असेल' असा उल्लेख या पत्रकात करण्यात आला आहे. 

राजकारणामध्ये प्रवेश करत असल्याची घोषणा कमल हसन यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. त्यांचे मित्र आणि 'सुपरस्टार' रजनीकांत यांनीही राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. जयललिता यांचे निधन, करुणानिधी यांची वयोमानानुसार खालावलेली प्रकृती आणि शशिकला यांचा तुरुंगवास यामुळे तमिळनाडूमध्ये निर्णायक नेतृत्वाची उणीव भासत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर या दोघांनी राजकारणात उडी घेतल्याने तमिळनाडूच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्‍यता राजकीय विश्‍लेषकांनी वर्तविली आहे. 

'येत्या 21 फेब्रुवारीपासून राज्यभरात दौरा सुरू करणार आहे. माझ्या राज्यातील जनतेचे नेमके प्रश्‍न काय आहेत, त्यांच्या गरजा काय आहेत, त्यांची स्वप्ने काय आहेत हे मला जाणून घ्यायचे आहे. राज्यभरातील जनतेला भेटण्याची ही कृती म्हणजे निव्वळ प्रसिद्धीचा स्टंट किंवा बंडखोरी नाही. राज्यातील जनतेला जाणून घेण्याचा हा माझा प्रवास आहे', असे हसन यांनी पत्रकात नमूद केले आहे. 

Web Title: marathi news marathi websites kamal hassan Tamilnadu politics