हिंदुस्थान हा हिंदूंचा देश : मोहन भागवत 

पीटीआय
शनिवार, 28 ऑक्टोबर 2017

इंदोर : हिंदुस्थान हा हिंदूंचा देश आहे. जसे जर्मनीत राहणारा जर्मन, अमेरिकेत राहणारा अमेरिकी म्हणून ओळखले जातात, तसेच हिंदुस्थानमध्ये राहणारे नागरिक हिंदू आहेत, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले. 

ते काल संघाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. ते म्हणाले, की हिंदुस्थान हा हिंदूंचा देश आहे; मात्र याचा अर्थ असा नाही, की दुसऱ्या धर्माचे नागरिक या ठिकाणी राहू शकत नाहीत. सरकार एकट्याने देशाचा विकास करू शकत नाही. यासाठी समाजातील सर्व वर्गातील लोकांचा सहभाग आवश्‍यक आहे. विकासासाठी प्रत्येक वेळी सरकारवर अवलंबून राहण्यापेक्षा नागरिकांनी स्वत: पुढाकार घेण्याची गरज आहे, असे त्यांनी नमूद केले.

सकारात्मक बदलाला सामोरे जाण्यासाठी संपूर्ण समाजाला तयार राहण्याची आवश्‍यकता आहे. देशाला प्रगतीच्या शिखरावर एखादा व्यक्ती, पक्ष, धोरण किंवा सरकार नेऊ शकत नाही. ही बाब विकासाशी निगडित आहे आणि त्यासाठी समाजाने सज्ज राहणे आवश्‍यक आहे. जुन्या काळात नागरिक विकासासाठी देवावर अवलंबून राहयचे; मात्र कलियुगात लोक सरकारला जबाबदार मानतात. वास्तविक समाजाने साथ दिली तरच सरकार विकास साध्य करू शकते. समाज हा सरकारला पित्यासमान असतो. जेव्हा नागरिक स्वत:मध्ये बदल घडवतील, तेव्हाच सरकार आणि व्यवस्थेत त्याचा परिणाम दिसू लागेल, असे भागवत म्हणाले. 

Web Title: marathi news marathi websites Mohan Bhagwat RSS