अपहरणाच्या धमकीमुळे 'जेट एअरवेज'च्या विमानाचे 'इमर्जन्सी लँडिंग' 

वृत्तसंस्था
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

अहमदाबाद : मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या 'जेट एअरवेज'च्या विमानाच्या अपहरणाची धमकी मिळाल्याने हे विमान तातडीने अहमदाबाद येथील विमानतळावर उतरविण्यात आले. विमानातील सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुखरूप आहेत. 

'या विमानामध्ये अपहरणकर्ते आहेत. हे विमान आता इतरत्र कुठेही न उतरता थेट पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये नेले जाईल. विमानाचे लँडिंग करण्याचा प्रयत्न झाला, तर प्रवाशांच्या मृत्यूचे आवाज तुमच्यापर्यंत पोचतील. याला विनोद समजू नका. विमानाच्या कार्गोमध्ये बॉम्ब आहे आणि तुम्ही हे विमान दिल्लीत उतरविले, तर आम्ही स्फोट घडवू', अशा आशयाचे पत्र कर्मचाऱ्यांना या विमानाच्या स्वच्छतागृहात आढळले. 

यानंतर वैमानिकाने तातडीने एअर ट्रॅफिक कंट्रोलला कळविले आणि विमान अहमदाबाद विमानतळावर उतरविले. मुंबईतून पहाटे 2.55 वाजता उड्डाण केलेले हे विमान अहमदाबादमध्ये पहाटे 3.45 च्या सुमारास उतरविण्यात आले. विमानतळ प्रशासनाने या घडामोडींना पुष्टी दिली आहे आणि पोलिसांना त्याची माहिती दिल्याचेही सांगितले. 

'विमानाला असलेल्या धोक्‍यामुळे हे विमान अहमदाबाद येथे उतरविण्यात आले. या विमानात 115 प्रवासी आणि सात कर्मचारी होते', अशी माहिती 'जेट एअरवेज'ने दिली. 

Web Title: marathi news marathi websites Mumbai News Jet Airways Emergency Landing