तोगडिया बेपत्ता असल्याचा विश्‍व हिंदू परिषदेचा दावा 

वृत्तसंस्था
सोमवार, 15 जानेवारी 2018

अहमदाबाद : विश्‍व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रवीण तोगडिया आज सकाळपासून बेपत्ता झाल्याचा दावा करून त्यांचा शोध घ्यावा, अशी मागणी विहिंपने केली आहे. तोगडिया यांना अटक केल्याचा आरोप करत विहिंपच्या कार्यकर्त्यांनी सकाळी आंदोलन केले होते; मात्र नंतर ते बेपत्ता असल्याचा दावा केला आहे. 

स्थानिक सोला पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की ""जमावबंदीच्या उल्लंघनप्रकरणी तोगडिया यांना अटक करण्यासाठी राजस्थान पोलिसांचे पथक त्यांच्या घरी गेले होते; मात्र तेथे तोगडिया सापडले नाहीत.'' 

तोगडिया यांना त्वरित शोधून काढावे या मागणीसाठी विहिंप कार्यकर्त्यांनी सरखेज-गांधीनगर महामार्ग रोखून धरत आंदोलन केले. विहिंपचे गुजरात प्रदेश सरचिटणीस रणछोड भरवाड म्हणाले, ""आज सकाळी दहापासून तोगडिया बेपत्ता आहेत. त्यांच्या सुरक्षेची सारी जबाबदारी प्रशासनाची आहे. त्यांना अटक केली आहे की नाही याबाबत नक्की माहिती नाही.'' विहिंपचे प्रवक्ते जय शहा यांनी मात्र राजस्थान पोलिस तोगडिया यांना अटक करून घेऊन गेले असल्याचा दावा केला. 

दरम्यान, राजस्थान पोलिसांनीही तोगडिया यांना अटक केल्याचे वृत्त फेटाळले असून, ते आमच्या ताब्यात नसल्याचे स्पष्ट केले आहे. तोगडिया घरात नसल्याने त्यांना अटक न करताच गंगापूर पोलिसांचे पथक परतल्याचा दावा पोलिस अधिकाऱ्याने केला. 

Web Title: marathi news marathi websites Pravin Togadia VHP