सुटा-बुटातील राहुल यांचे बहारिनमध्ये जंगी स्वागत 

सुटा-बुटातील राहुल यांचे बहारिनमध्ये जंगी स्वागत 

नवी दिल्ली : काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यापासून आणि गुजरातच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारापासून राहुल गांधी सतत चर्चेत आहेत. खादीचा कुडता व पायजमा ही वेशभूषा ही त्यांची ओळख बनली असली तरी, राहुल गांधी अन्य पेहरावात दिसले की माध्यमांमध्ये त्याची दखल घेतली जाते.

आखाती देशांमधील बहारिनच्या दौऱ्यावर राहुल गांधी सोमवारी सुटा-बुटात दिसले. विमानतळावर या वेशातील राहुल यांचे स्वागत मोठ्या जल्लोषात झाले. याची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. 

"ग्लोबल ऑर्गनायझेशन ऑफ पीपल ऑफ इंडियन ओरिजिन' (जीओपीआयओ) या संघटनेच्या निमंत्रणावरून राहुल गांधी आज अनिवासी भारतीयांच्या परिषदेसाठी बहारिनला पोचले. संघटनेच्या सदस्यांनी विमानतळावर त्यांचे भव्य स्वागत केले. काँग्रेसच्या नव्या सेनापतीशी हस्तांदोलन करण्यासाठी आणि त्यांच्याबरोबर सेल्फी काढण्यासाठी एकच झुंबड उडाली होती. सुरक्षा व्यवस्था भेदून काही जण राहुल यांना भेटण्याचा प्रयत्न केला. 

या दौऱ्यात राहुल गांधी बहारिनमधील अनिवासी भारतीयांशी संवाद साधणार आहे. दौऱ्यावर जाण्यापूर्वी त्यांनी ट्विट केले होते. ""सॉफ्ट पॉवरचे "एनआयआर' आपले खरेखुरे प्रतिनिधी असून, जगातील आपल्या देशाचे ते ब्रॅंड ऍम्बेसिडर आहेत,' असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, राहुल गांधी यांनी अल वादी राजवाड्यात युवराज शेख खालिद बिन हमाद अल खलिफा यांचीही भेट घेतली, असे काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आले. या दोघांमध्ये खेळांविषयी चर्चा झाली. खेळ आणि क्रिकेटचा प्रसार करण्यासाठी एकत्रित काम करण्याबाबतही ते बोलले. अनिवासी भारतीयांमध्ये काँग्रेस पक्षाची प्रतिमा अधिक दृढ करण्याचा प्रयत्न या दौऱ्यातून होणार असल्याचेही पक्षाने सांगितले. 

"राहुलकडून मोदींची नक्कल' 
राहुल गांधी यांच्या एक दिवसाच्या बहारिन दौऱ्यात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले असले तरी, भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते नरसिंह राव यांनी त्यावर टीका केली आहे. आज केलेल्या ट्‌विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल करीत आहेत. आधी ते महाविद्यालयात गेले. नंतर मंदिरांना भेटी दिल्या. आता ते अनिवासी भारतीयांशी संवाद साधत आहेत.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com