वैष्णोदेवीसाठी नवीन मार्ग सुरू करण्याचा आदेश स्थगित 

वृत्तसंस्था
सोमवार, 20 नोव्हेंबर 2017

नवी दिल्ली : वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी बॅटरीवरच्या मोटारींना आणि पायी जाणाऱ्या भाविकांना येत्या 24 नोव्हेंबरपर्यंत नवीन मार्ग सुरू करण्याच्या राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशास सर्वोच्च न्यायालयाने आज स्थगिती दिली आहे. न्यायधीश मदन बी लोकूर आणि न्यायधीश दीपक गुप्ता यांच्या दोन सदस्यीय पीठाने श्री माता वैष्णोदेवी मंदिर बोर्डाचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर स्थगिती आदेश दिला. हवामानामुळे येत्या 24 नोव्हेंबरपर्यंत नवीन मार्ग सुरू करणे शक्‍य नसल्याचे मंदिर बोर्डाने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले. 

मंदिर बोर्डाच्या वतीने वरिष्ठ अधिवक्ता मुकुल रोहतगी यांनी पीठाला सांगितले की, वैष्णोदेवीच्या गुहेकडे जाण्यासाठी दुसऱ्या मार्गाचे काम सुरू असून पुढील वर्षी फेब्रुवारीपर्यंत सुरू होईल. देवीकडे जाण्यासाठी अगोदरपासूनच दोन मार्ग असून आता बोर्ड तिसरा मार्ग तयार करत आहे. मंदिर बोर्डाचे म्हणणे ऐकल्यानंतर पीठाने हरित लवादाने ज्या याचिकेच्या आधारावर आदेश दिला होता, त्या याचिकादारासही नोटीस बजावली.

एनजीटीने 13 नोव्हेंबर रोजी वैष्णोदेवी मंदिर बोर्डाला दिलेल्या आदेशात एकावेळी 50 हजारांपेक्षा अधिक भाविकांना सोडू नये असे सांगितले होते. भाविकांची वाढती संख्या पाहता एनजीटीने हा निर्णय घेतला होता. जर 50 हजारांहून अधिक भाविकांची संख्या झाली तर त्यांना अर्द्धकुंवारी किंवा कटारा येथे थांबविण्यात येईल, असे सांगितले.

तसेच जर एखादा भाविक वैष्णोदेवीकडे जाणाऱ्या मार्गावर किंवा बसस्थानक पसिरात कचरा टाकत असेल तर त्याला दोन हजाराचा दंड ठोठावा, असे निर्देश दिले होते. पायी जाणाऱ्या भाविकांना आणि विशेषत: ज्येष्ठ नागरिकांसाठी हा कचरा किंवा घाण धोक्‍याचा ठरू शकतो, असे एनजीटीने म्हटले होते.

Web Title: marathi news marathi websites Vaishno Devi NGT Supreme Court