मुकुल रॉय यांना केंद्राची 'वाय' सुरक्षा 

मुकुल रॉय यांना केंद्राची 'वाय' सुरक्षा 

कोलकता : तृणमूल कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर भाजपप्रवेशाचे संकेत देणारे ज्येष्ठ नेते मुकुल रॉय यांची राज्य सरकारने 'झेड' सुरक्षा काढून घेतल्यानंतर केंद्राने त्यांना 'वाय' श्रेणीतील सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे.

रॉय यांच्या संरक्षणासाठी केंद्राने बारा जवान तैनात केले आहेत. दार्जिलिंगमधील निमलष्करी दलाच्या तुकड्या माघारी घेण्याचा निर्णय केंद्राने घेतल्याने पश्‍चिम बंगाल सरकार आणि केंद्र यांच्यात जुंपली असताना आता रॉय यांना संरक्षण देण्यात आल्याने हा वाद आणखी चिघळू शकतो. 

मध्यंतरी तृणमूल कॉंग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष राहुल सिंघा यांना 'सीआरपीएफ'चे संरक्षण कवच बहाल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, यालाही राज्य सरकारने तीव्र आक्षेप घेतला होता.

संरक्षणक्षेत्रातील जाणकारांनीही याला तीव्र आक्षेप घेतला आहे. राज्यातील कोणत्या व्यक्तीला संरक्षण द्यायचे किंवा नाही, याचा निर्णय राज्य आणि केंद्र सरकारला घ्यावा लागतो. 'स्पेशल प्रोटेक्‍शन ग्रुप' अथवा 'एनएसजी'व्यतिरिक्त एखाद्या व्यक्तीस संरक्षण द्यायचे असेल तर याचा निर्णय संबंधित व्यक्ती ज्या राज्यामध्ये राहाते तेथील सरकारला घ्यायचा असतो. 

अपवादात्मक स्थितीचा विचार 
बऱ्याच प्रकरणांमध्ये केंद्र सरकारच्या निर्देशावरूनच राज्य सरकार संबंधित व्यक्तीस संरक्षण देते. मुकुल रॉय प्रकरणामध्ये मात्र केंद्राने अपवादात्मक स्थिती लक्षात घेऊन थेट यात हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्राने राज्यामध्ये आपल्या ताब्यातील सैनिक पाठविल्याने राज्य सरकार संतापले आहे, रॉय हे तृणमूल कॉंग्रेसचे राज्यसभा सदस्य असून ते पक्षाच्या संस्थापंकापैकी एक आहेत. मध्यंतरी त्यांनी ममतांच्या पुतण्यावर टीका करत पक्षाचा त्याग केला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com