ऑनलाईन शॉपिंगमध्ये आता 'इंडियन साईज'

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 मार्च 2018

नवी दिल्ली - ऑनलाईन शॉपिंग असो अथवा मॉलमधले शॉपिंग कपड्यांची खरेदी करताना आपण एखाद्या विशिष्ट ब्रँडचे कपडे घेताना त्याचा साईज चार्ट आपल्याला फॉलो करावा लागतो. हा साईज चार्ट बऱ्याचदा अमेरिका, ब्रिटन यासारख्या देशांच्या साईज चार्टवर अवलंबून असतो. मात्र आता नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (निफ्ट) 'इंडियन साईज' साठी सर्व्हे सुरु करणार आहे. त्यानंतर भारतासाठी देखील स्वत:चा 'स्टॅंडर्ड साईज चार्ट' असेल.

यासाठी भारतातील मुंबई, नवी दिल्ली, कोलकाता, हैदराबाद, बंगळूर, चेन्नई आणि शिलाँग या शहरांमध्ये 15 ते 65 वयोगटातील 25 हजार स्त्री- पुरुषांचे परिक्षण करुन हा साईज चार्ट बनविण्यात येणार आहे. 

यासाठी थ्रीडी तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असून, यामध्ये मात्र 10 संकंदात हा स्कॅनर संपूर्ण शरीराची मेजरमेंट्स घेणार आहे. 

'निफ्ट'चे राजेश शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, यानंतर मॉलमध्ये मिळणाऱ्या कंपड्यांवर त्यांची 'इंडियन साईज' देखील देता येणार आहे. 2021पर्यंत हा सर्व्हे पूर्ण करण्याचा 'निफ्ट'चा मानस आहे.

Web Title: marathi news measurement online shopping clothes