मेट्रो उद्घाटनासाठी "मेट्रो मॅन'चा विसर

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 जून 2017

कोची - कोची मेट्रोच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या पाहुण्यांच्या यादीतून "मेट्रो मॅन' ई. श्रीधरन यांचे नाव वगळण्याच्या पंतप्रधान कार्यालयाच्या निर्णयाने मोठा वादंग केरळमध्ये निर्माण झाला आहे. श्रीधरन यांनी मात्र, पंतप्रधानांची सुरक्षा महत्वाची असल्याचे सांगत या वादावर पडदा टाकणे पसंत केले.

शनिवारी होणाऱ्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अंतिम तयारीची पाहणी श्रीधरन यांनी आज केली. या वेळी बोलताना ते म्हणाले, ""पंतप्रधान कार्यक्रमाला येणार असून, त्यावेळी किती जणांना व्यासपीठावर निमंत्रित करावयाचे याला मर्यादा येतात. त्यामुळे मला निमंत्रित न करण्यामध्ये काही वावगे नाही. यातून कृपया वाद निर्माण करू नका. पंतप्रधानांची सुरक्षा महत्वाची आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षा यंत्रणांनी तयारी केल्याप्रमाणे कार्यक्रम व्हायला हवा.''

केरळ सरकारचे पंतप्रधान कार्यालयाला पत्र
मेट्रो उद्घाटन कार्यक्रमाच्या पाहुण्यांच्या यादीत श्रीधरन यांच्यासह विरोधी पक्ष नेते रमेश चेन्निथला आणि स्थानिक आमदार अशा तिघांची नावे समाविष्ट करावीत, असे पत्र केरळ सरकारने पंतप्रधान कार्यालयाला पाठविले आहे. कार्यक्रमासाठी व्यासपीठावर पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू, खासदार टी.के.व्ही. थॉमस, राज्यमंत्री थॉमस चंडी आणि महापौर सौमिनी जैन असे सात जणच असतील, असे पंतप्रधान कार्यालयाने याआधी स्पष्ट केले आहे.

येथे कामगार असल्याने मला निमंत्रणाची गरज नाही. त्यामुळे निमंत्रण नसल्याबद्दल माझी नाराजी नाही.
- ई. श्रीधरन

Web Title: marathi news metro news metro man maharashtra news