शमीने त्याच्या भावासोबतच शरीरसंबंध ठेवण्यास सांगितले; पत्नीचा आरोप

वृत्तसंस्था
शनिवार, 10 मार्च 2018

कोलकाता - टीम इंडियाचा गोलंदाज मोहम्मद शमीच्या पत्नीने दाखल केलेल्या तक्रारीनंतर शमीबद्दल अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. त्याच्यावर खूनाचा प्रयत्न, बलात्कार, मारहाण केल्याचा गंभीर गुन्हा दाखल झाला असतानाच आता, शमी आपल्याला त्याच्या भावाबरोबर शरीरसंबंध ठेवण्यासाठी बळजबरी करत असल्याचाही आरोप हसीन जहांने केला आहे.

''हसीब (शमीचा भाऊ) असलेल्या खोलीत एकदा शमीने मला ढकलले त्यानंतर त्याने दरवाजा बाहेरुन बंद करुन घेतला. त्याच्या भावाने गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केल्यावर मी आरडाओरडा केला तेव्हा शमीने पुन्हा दरवाजा उघडला'' असे तिने म्हटले आहे.

हसीन जहांने दाखल केलेल्या लेखी तक्रारीनंतर शमीबरोबर त्याच्या कुटुंबियांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये त्याची आई अंजुमन आरा, बहिण सबिना अंजुम, भाऊ मोहम्मद हसीब अहमद आणि भावाची पत्नी शामा परवीन यांचा समावेश आहे.

Web Title: marathi news mohammed shami booked murder bid rape and assault