शमीचे अनेक तरुणींशी अनैतिक संबंध,पत्नीचा दावा

वृत्तसंस्था
बुधवार, 7 मार्च 2018

मुंबई - टीम इंडियाचा गोलंदाज महंमद शमीच्या पत्नीने नुकत्याच लिहिलेल्या फेसबुक पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरल्या आहे. शमीचे अनेक महिलांसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप पत्नी हसीन जहांने या पोस्टमध्ये केला आहे. एवढेच नाही, तर शमीच्या खासगी चॅटचे स्क्रीनशॉटही त्याच्या पत्नीने शेअर केले आहेत. हसीन जहांने मंगळवारी फेसबुकवर 11 पोस्ट केल्या आहेत. शमीने आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोपही तिने केला आहे. शमीच्या पत्नीने पोस्ट केलेल्या स्क्रीनशॉट्समध्ये काही महिलांचे फोटो आणि अश्लील चॅट दिसत आहेत. यापैकी कोणत्याही चॅटमध्ये शमीची ओळख पटत नाही.

मुंबई - टीम इंडियाचा गोलंदाज महंमद शमीच्या पत्नीने नुकत्याच लिहिलेल्या फेसबुक पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरल्या आहे. शमीचे अनेक महिलांसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप पत्नी हसीन जहांने या पोस्टमध्ये केला आहे. एवढेच नाही, तर शमीच्या खासगी चॅटचे स्क्रीनशॉटही त्याच्या पत्नीने शेअर केले आहेत. हसीन जहांने मंगळवारी फेसबुकवर 11 पोस्ट केल्या आहेत. शमीने आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोपही तिने केला आहे. शमीच्या पत्नीने पोस्ट केलेल्या स्क्रीनशॉट्समध्ये काही महिलांचे फोटो आणि अश्लील चॅट दिसत आहेत. यापैकी कोणत्याही चॅटमध्ये शमीची ओळख पटत नाही. मात्र एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने हसीन जहांशी संपर्क साधला असता हे फेसबुक अकाऊण्ट आपलेच असल्याचे तिने सांगितले आहे. महंमद शमी सध्या धर्मशालामध्ये आहे. 

महंमद शमी आणि त्याच्या कुटुंबीयांवर हसीन जहां यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. शमीने सातत्याने आपला शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचेही तिने म्हटले आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरुन परतल्यानंतरही त्याने आपल्याला मारहाण केल्याचा आरोप तिने केला आहे.

हसीन जहांने नागपूर आणि पाकिस्तानातील काही महिलांचा उल्लेख या पोस्टमध्ये केला आहे. फेसबुक पोस्टमध्ये संबंधित महिलांची नावे स्पष्ट दिसत आहेत. एका फोटोमध्ये सांबामध्ये राहणारी एक महिला शमीची गर्लफ्रेण्ड असल्याचा दावाही तिने केला आहे.

27 वर्षीय महंमद शमी लग्न 2014 मध्ये झाले होते. त्यांना आयरा ही मुलगी आहे.

Web Title: marathi news mohammed shamis hasin jahan extra marital affair facebook post