भ्रष्टाचारविरोधी पथक करणार शमी संबंधित आरोपांची चौकशी

वृत्तसंस्था
बुधवार, 14 मार्च 2018

शमीची पत्नी जहांने असे आरोप केले होते की, ''शमी मॅच फिक्सिंगमध्ये सहभगी असू शकतो, कारण तो कोलकातामध्ये पाकिस्तानी महिला अलिस्बाकडून पैसे स्विकारत होता.''

मुंबई : भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. शमीची पत्नी हसीन जहांने त्याच्यावर केलेल्या मॅच फिक्सिंगच्या आरोपानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भ्रष्टाचारविरोधी पथकाला याबाबत दखल घेऊन चौकशी करण्याची मागणी केली आहे.  

बुधवारी सकाळी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासक समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी भ्रष्टाचारविरोधी पथकाचे प्रमुख नीरज कुमार यांना ई-मेलद्वारे या आरोपांच्या चौकशीची मागणी केली आहे, त्याचबरोबर एका आठवड्यात याचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. हा मेल बीसीसीआयचे सर्व पदाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांनाही पाठविण्यात आला आहे. 

यामध्ये शमीविरोधातील आरोपांचा, विविध माध्यमातील अहवालांचा उल्लेख आहे. प्रशासक समितीने, शमी व त्याच्या पत्नीमधील संभाषणांचे काही रेकॉर्डिंग ऐकले आहेत व दावा केला आहे. या संभाषणात शमी दुसरी व्यक्ती 'मोहम्मद भाई'शी संवाद करत आहे, ज्या व्यक्तीने पाकिस्तानी महिला 'अलिस्बा' हिच्यामार्फत शमीला पैसे पाठवले. असे राय यांनी मेलमध्ये लिहीले आहे.   

शमीची पत्नी जहांने असे आरोप केले होते की, ''शमी मॅच फिक्सिंगमध्ये सहभगी असू शकतो, कारण तो कोलकातामध्ये पाकिस्तानी महिला अलिस्बाकडून पैसे स्विकारत होता.''

राय यांनी कुमार यांना या संबंधातील चौकशी करताना काही विशेष गोष्टींची तपासणी करायला सांगितले आहे, बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी नियमांच्या अंतर्गत वरील आरोपांचा तपास करा व निष्कर्षांनुसार प्रशासक समितीकडे अहवाल सादर करा, असा आदेश प्रशासक समितीने दिला आहे. 

Web Title: Marathi news mumbai news shami cricket match fixing inquiry by Anti-Corruption Unit