शी जिनपिंग भारतात; मोदी जिनपिंग यांच्यात दुसरी अनौपचारिक भेट

सकाळ वृत्तसेवा
Friday, 11 October 2019

तामिळनाडूच्या महाबलीपुरममध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची आज भेट झाली. या भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग हे चेन्नईपासून जवळच असलेल्या महाबलीपुरममध्ये गेलेत. दोन्ही नेत्यांमध्ये ही दुसरी अनौपचारिक भेट झाली.  

महाबलीपुरममध्ये मोदी आणि शी जिनपिंग भेट 

पंतप्रधान नरेंद्र मोडी आणि चीन चे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची तामिळनाडूच्या महाबलीपुरममध्ये अनौपचारिक भेट झाली. यानंतर दोन्ही नेत्यांनी शोर टेंपल जवळ नृत्याचा आनंद घेतला.

याठिकाणी विदेशमंत्री एस जयशंकर प्रसाद  आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल हजार होते. 

तमिळ धोती आणि कुर्ता या वेशभूषेत नरेंद्र मोदी यांनी चीनचे राष्ट्रपती जिनपिंग यांना 16.5 स्केअर कि.मी. मधल्या कृष्णा बटर बॉल या ऐतिहासिक वारसा असलेल्या भागातील प्रसिद्ध जागा दाखवल्या.   

सर्वात आधी मोदी आणि आणि जिनपिंग हे अर्जुन तपस्यास्थळ मग कृष्णा बटरलबॉल नंतर पंच रथ आणि त्यानंतर तट मंदिर (शोर टेंपल) ला गेलेत. दरम्यान नरेद्र मोदी यांनी या सर्व जागांची माहिती शी जिनपिंग यांना दिली. यावेळी मोदी आणि जिनपिंग यांनी हातात हात घालून फोटो पण काढलेत.  

पंच रथ टेंपल मध्ये चर्चा करताना दोन्ही नेत्यांनी नारळाच्या पाण्याचा आस्वाद घेतला. 
 
WebTitle : marathi news naredra modi and xi jinping met in mahabalipuram

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news naredra modi and xi jinping met in mahabalipuram