पंतप्रधानांसह फोटोत नीरव मोदी कसा?

narendra-modi-nirav-modi
narendra-modi-nirav-modi

नवी दिल्ली -  नीरव मोदी घोटाळा प्रकरणी विरोधी पक्षांनी केंद्र सरकारला धारेवर धरले असताना आता, दावोसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत काढलेल्या सीईओंची समूह फोटो व्हायरल झाला आहे. यामध्ये घोटाळेबाज नीरव मोदी असल्याने या फोटोची चांगलीच चर्चा आहे. नीरव मोदी या फोटोमध्ये कसा? याचे पंतप्रधानांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी डावे पक्ष आणि तृणमूल काँग्रेसने केली आहे. तर, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी, 'नरेंद्र मोदींना मिठी मारा आणि 12 हजार कोटी मिळवा', अशी अत्यंत तिरकस टिपणी पंतप्रधानांवर केली आहे. 

दरम्यान, सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  दावोसमध्ये झालेल्या आर्थिक परिषदेला नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावली होती. पंतप्रधानांसोबत नेहमीप्रमाणे राजकारणी आणि उद्योगपतींचे शिष्टमंडळही दावोसला गेले होते. परंतु, यामध्ये नीरव मोदीचा समावेश नव्हता. या परिषदेतील एका बैठकीनंतर पंतप्रधान मोदी यांना काही भारतीय उद्योगपतींबरोबर फोटो काढण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी तेथे नीरव मोदी उपस्थित असावा. 

पंजाब नॅशनल बँकेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या नीरव मोदीने अधिकृत तक्रार दाखल होण्यापूर्वीच देशातून पलायन केल्याचे उघड झाले आहे. या फसवणुकीप्रकरणी पंजाब नॅशनल बँकेची तक्रार 'सीबीआय'कडे 29 जानेवारी रोजी वर्ग झाली. परंतु, नीरव मोदी एक जानेवारी रोजीच देशातून बाहेर गेला होता. सध्या तो स्वित्झर्लंडमध्ये असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com