ईशान्य भारतात भाजपची मुसंडी; डाव्यांच्या हातून आणखी एक राज्य गेले! 

वृत्तसंस्था
शनिवार, 3 मार्च 2018

नवी दिल्ली : वर्षानुवर्षे सत्तेत राहिल्यामुळे सत्ताधाऱ्यांविरोधात जाणारा 'अँटी-इन्कम्बसी'च्या घटकाची साथ, स्थानिक गटांना साथीला घेत उभे केलेले आव्हान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तळापर्यंत पोचलेल्या नेटवर्कच्या मदतीने भारतीय जनता पक्षाने (भाजप) ईशान्य भारतात जोरदार मुसंडी मारली. पाच वर्षांपूर्वी या भागात भाजपची काहीही शक्ती नव्हती आणि आता ईशान्य भारतातील आणखी दोन राज्यांमध्ये सत्ता मिळविली आहे. 

भाजपच्या या जोरदार मुसंडीमुळे काँग्रेसला मेघालयमध्ये कडवे आव्हान उभे राहिले आहे. मेघालयमध्ये काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या, तरीही त्यांना स्वबळावर बहुमत मिळणे अवघड आहे. दुसरीकडे, डाव्या पक्षांच्या हातून आणखी एक राज्य निसटले. 

ईशान्य भारतामधील आसाम, मणिपूर आणि अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपची सत्ता आहे. आता त्रिपुरामध्ये भाजपची स्वबळावर सत्ता आली आहे. नागालॅंडमध्येही भाजपला सत्ता स्थापन करण्यात अडचण येणार नाही. या निवडणुकीपूर्वी देशातील 29 पैकी 19 राज्यांमध्ये भाजपची सत्ता होती. 

'आता संपूर्ण ईशान्य भारत भाजपसोबत आहे. आधी आम्ही 'काँग्रेसमुक्त भारत' म्हणत असू; आता 'वामपंथी मुक्त भारत' झाला आहे', अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी व्यक्त केली. ईशान्य भारतामध्ये रेल्वे आणि रस्त्यांचे जाळे वाढविण्यासाठी केंद्र सरकारने राबविलेल्या उपक्रमांमुळेही जनमत भाजपच्या बाजूने वळले, असे तज्ज्ञांचे मत आहे.

Web Title: marathi news Narendra Modi Tripura Elections BJP North East